नवी मुंबई : आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या तिघांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका इमारतीच्या छतावरील खोलीमध्ये हा सट्टा सुरू होता.पनवेल बस स्थानकालगतच्या दीपा बारच्या मागे क्रिकेटवर सट्टा लावला जात असल्याची माहिती परिमंडळ २चे उपआयुक्त विश्वास पांढरे यांना मिळाली. याची खात्री करून त्यांनी पनवेल शहर पोलिसांमार्फत शुक्रवारी छापा टाकला. साई आर्केड इमारतीच्या छतावरील रिकाम्या खोलीमध्ये हा क्रिकेट सामन्याचा सट्टा सुरू होता. त्या वेळी सुरू असलेल्या आयपीएलच्या ‘चेन्नई सुपर किंग्ज’ विरुद्ध ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ या सामन्यावर तिथे सट्टा लागला होता. तिथे छापा टाकून मंजुनाथ शेट्टी, सुभाष शेट्टी व संदीप सालीयन यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे पोलीस उपआयुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. १ लाख २७ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सट्टेबाजीसाठी वापरलेले पाच मोबाइल फोन आणि एक टीव्ही जप्त करण्यात आला आहे. एकूण १ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पनवेल पोलिसांनी जप्त केला आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
आयपीएलवर सट्टा लावणाऱ्यांना अटक
By admin | Updated: May 25, 2015 02:31 IST
आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या तिघांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात
आयपीएलवर सट्टा लावणाऱ्यांना अटक
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}