Join us

मुलीवर अत्याचार करणा-या बापाला अटक

By admin | Updated: January 11, 2015 23:26 IST

मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला एमएफसी पोलिसांनी गजाआड केले आहे. गेले वर्षभर हा अत्याचार सुरू होता. पीडित तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीवरून समोर आले

कल्याण : मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला एमएफसी पोलिसांनी गजाआड केले आहे. गेले वर्षभर हा अत्याचार सुरू होता. पीडित तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीवरून समोर आले आहे.३ नोव्हेंबर २०१३ ते ८ जानेवारी २०१५ या कालावधीत अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुझ्यासह आईला व भावंडांना जीवे मारून टाकीन, अशी धमकी या तरुणीला वारंवार दिली जात होती. अखेर, शुक्रवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन धाडसाने तिने यासंदर्भात तक्रार दाखल केली. त्याच्यावर लैंगिक अत्याचारासह मारहाण, दमदाटी, शिवीगाळ करणे आदी गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना आंबिवली परिसरातली आहे.