मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्ताने वाटण्यात आलेल्या तिरंगी बर्फीमुळे झालेल्या विषबाधाप्रकरणी सायन रुग्णालयाचे कॅण्टीन चालवणा:या गोपाळ मंजा देवडीया आणि हेताम श्रीनेसी चंद्र वरमा या दोघांना सायन पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयात पाठवण्यात आल्याची माहिती सायन पोलीस ठाण्याचे निरीक्षक गावित यांनी दिली.
सायन रुग्णालयातील कॅण्टीन चालवणा:याने स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगी बर्फी तयार केली होती. मात्र ही बर्फी खाल्ल्यावर निवासी डॉक्टरांना जुलाब, उलटय़ा, पोटदुखी असा त्रस जाणवू लागला. 47 निवासी डॉक्टरांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. यापैकी अजून तिघांना वॉर्डमध्येच ठेवले आहे. इतर सर्वाना डिस्चार्ज दिल्याची माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. निवासी डॉक्टरने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यावर दोघांना अटक करण्यात आली आहे. गोपाळ मंजा देवडीया (39) हा कॅण्टीन मॅनेजर असून हेताम श्रीनेसी चंद्र वरमा (3क्) हा कॅण्टीनमध्ये नोकरी करतो. सायनमधील एका दुकानातून त्यांनी मावा खरेदी केला होता. मावा खराब झाल्यामुळेच विषबाधा झाली असेल असा प्राथमिक अंदाज आहे.