मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे झोपेवर परिणाम होत आहेत. झोप अपुरी होणे, झोप न लागणे अशा तक्रारींना अनेकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अपूर्ण झोपेचे दुष्परिणाम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, त्याविषयी जनजागृती व्हावी याकरिता १६ मार्च हा ‘जागतिक निद्रा दिन’ म्हणून पाळला जातो. यानिमित्ताने करण्यात आलेल्या नेल्सन स्टडीच्या अलीकडच्या सर्वेक्षण अहवालानुसार, ९३ टक्के भारतीयांना अपुरी झोप मिळते, असे आढळून आले आहे.झोपेच्या समस्यांमुळे आपल्या नकळत आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतात. माणसाला कार्यक्षम राहण्यासाठी, उत्साहासाठी, भावनिक समतोलासाठी, एकूणच शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी आठ तास झोप अत्यावश्यक आहे. तणावपूर्ण काम, झोपेच्या चुकीच्या सवयींमुळे विकार जडण्याची भीती असते. पण आपल्या देशात निद्रानाशाकडे दुर्लक्ष केले जाते, असे डॉ. राजा अमरनाथ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अहवालानुसार, भारतीयांमध्ये ‘आॅबस्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया’ म्हणजे ‘ओएसए’ हा आजार (झोपेच्या दरम्यान श्वास बंद पडण्याचा आजार) सर्रास आढळून येतो. यामध्ये संबंधित व्यक्तीचा झोपेत श्वास थांबतो व त्याला श्वास घेण्यासाठी वारंवार झोपेतून उठावे लागते. परिणामी त्या व्यक्तीला दिवसभर थकवा येतो, असे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे.निद्राविकार धोकादायकझोपेत घोरत असताना, घोरणाऱ्या व्यक्तीचे कंठ बंद होऊन शरीराला आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे घोरणाºया व्यक्तीला डायबेटीस, ब्लड प्रेशर व हार्ट अॅटॅक यांसारखे आजार जडू शकतात, असे डॉ. शैलेश रामराजे यांनी सांगितले. झोपेत घोरण्याची सवय असेल तर वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. बदलत्या जीवनशैलीमुळे आज घोरण्याचे प्रमाण वाढत आहे.आयुष्याचा एक तृतीयांश भाग प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्याचा एक तृतीयांश भाग झोपेत घालवतो. अशातच बदललेल्या जीवनशैलीमुळे गेल्या चार दशकांत निद्रानाशाचे प्रमाण वाढले आहे. पुरेशा झोपेअभावी अनेकांना शारीरिक व्याधी जडल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून सकाळी लवकर शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांची पुरेशी झोप होत नाही. त्याचेही दुष्परिणाम आता समोर आले आहेत. निद्रानाश, अपुरी झोप हे अनेक रोगांना आमंत्रण देत असून त्यावर वेळीच उपाय करण्याची आवश्यकता आहे.>अपुºया झोपेचे दुष्परिणामसकाळी थकवा, आळस व डोकेदुखीआॅफिस मीटिंग किंवा वाहन चालवताना झोपलक्ष केंद्रित न होणे, दृष्टिदोष, नैराश्यलैंगिक संबंधांची अनिच्छा९३ टक्के भारतीयांना निद्रानाश५८ टक्के भारतीयांची झोप अपूर्ण झाल्याने कामावर परिणाम११ टक्के भारतीय रात्री अपूर्ण झोप झाल्याने कार्यालयांत झोपतात१९ टक्के भारतीयांची झोप अपूर्ण झाल्याने कौटुंबिक नातेसंबंधावर परिणाम होतात८७ टक्के भारतीयांचे झोपेच्या समस्यांमुळे आरोग्य खालावते७२ टक्के भारतीय रात्री साधारण तीन वेळा उठतात५ टक्के भारतीय कामाच्या ताणामुळे झोपेतून उठतात३३ टक्के भारतीय झोपेत घोरतात, त्यातील १४टक्के भारतीय बोलतात त्यापेक्षा मोठ्या आवाजात घोरतातकेवळ २ टक्के भारतीय झोपेच्या तक्रारींसाठी डॉक्टरकडे जातात
तब्बल ९३ टक्के भारतीयांना झोप येईना, झोप अपूर्ण राहिल्याने ५८ टक्के भारतीयांच्या कामावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 02:15 IST