Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेना उपशाखाप्रमुखाची हत्या

By admin | Updated: April 5, 2015 02:12 IST

शिवसेना उपशाखाप्रमुख आणि रिक्षाचालक केशव मोहिते यांची शनिवारी सकाळी निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या राजकीय वादातून झाली

बदलापूर : शिवसेना उपशाखाप्रमुख आणि रिक्षाचालक केशव मोहिते यांची शनिवारी सकाळी निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या राजकीय वादातून झाली असल्याचा आरोप त्यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीत केला आहे. हत्येच्या निषेधार्थ शहरातील रिक्षा बंद ठेवण्यात आल्या.शनिवारी सकाळी ७ वाजता मोहिते बदलापूर स्टेशनवरून प्रवासी घेऊन खरवई एमआयडीसीकडे गेले. प्रवासी म्हणून बसलेल्या तिघांनी तीक्ष्ण हत्यारांनी मोहितेंच्या हातापायावर वार केले. त्यात मोहिते गंभीर जखमी झाले. त्यांना डोंबिवलीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांचा मृत्यू झाला. मोहिते यांची हत्या ही जमिनीच्या वादातून झाली, राजकीय वादातून झाली की, अनैतिक संबंधातून झाली, या सर्व बाबींचा तपास केला जात आहे. मोहितेंच्या भावाने संशय घेतलेल्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे बदलापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ईश्वर आंदळकर यांनी सांगितले.