Join us

लष्कराचे कॅन्टीन होणार आॅनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:29 IST

लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही संरक्षण दलांच्या जवानांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाºया कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट (सीएसडी) आॅनलाइन होणार आहेत.

मुंबई : लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही संरक्षण दलांच्या जवानांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाºया कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट (सीएसडी) आॅनलाइन होणार आहेत.सीएसडीमार्फत चालविण्यात येणाºया युनिट रिटेल कॅन्टीन (यूआरसी)मार्फत १.२ कोटी ग्राहकांना आता किराणा दुकानांत मिळणाºया सर्व आधुनिक वस्तूही पुरविण्यात येणार आहेत. लष्करातील आजी व माजी सैनिक व अधिकारी यांना या दुकानांतून वाजवी दरात वस्तू मिळतात.लष्कराचे कॅन्टीन या नावानेच सामान्यांमध्ये परिचित असलेल्या सीएसडीचे देशात सर्वांत मोठे किरकोळ विक्रीचे नेटवर्क आहे. २0१६-१७मध्ये या कॅन्टीनची वार्षिक उलाढाल १७ हजार कोटी रुपये इतकी होती. सीएसडीकडून आता आपल्या व्यवस्थेचा संपूर्ण कायापालट करण्यात येत आहे. आपल्या भागीदार कंपन्यांच्या माध्यमातून वस्तू खरेदीसाठी लागणारा काळ कमी करण्यावरही सीएसडीकडून काम केले जात आहे. आपल्याला पाहिजे त्या वस्तू लष्करी कॅन्टीनमधून कार्डधारकांना मिळाव्यात अशा पद्धतीने नवी व्यवस्था उभी केली जात आहे.