Join us

टोळ्यांना शस्त्रसाठा पुरवणारा गजाआड

By admin | Updated: July 19, 2014 01:29 IST

कुख्यात छोटा राजन आणि उदय पाठक टोळीच्या गुडांना शस्त्रपुरवठा करण्यासाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या कक्ष अकराच्या अधिकाऱ्यांनी आज बोरिवली येथे अटक केली.

मुंबई : कुख्यात छोटा राजन आणि उदय पाठक टोळीच्या गुडांना शस्त्रपुरवठा करण्यासाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या कक्ष अकराच्या अधिकाऱ्यांनी आज बोरिवली येथे अटक केली. नागेंदर सौरु सहानी (२४) असे आरोपीचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील सहानी सध्या गोरेगाव येथील जवाहरनगर रोड नंबर १ येथे राहण्यास आहे. बोरिवली येथील लिंक रोड डॉन बॉस्को जंक्शन येथे एक संशयित छोटा राजन आणि उदय पाठक टोळीच्या गुंडाना शस्त्रपुरवठा करण्यासाठी येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक नितीन विचारे यांना मिळाली होती. या माहितीच्या त्यांच्या पथकाने शुक्र वारी सायंकाळी बोरिवली लिंक रोडवर येथे सापळा रचून सहानीला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल, गावठी कट्टा जप्त केला.