Join us

आरिफची ‘नार्को’ करणार

By admin | Updated: November 30, 2014 02:26 IST

आरिफ माजिद तपासात मोघम उत्तरे देत असल्याने खरी माहिती काढण्यासाठी ‘नार्को अॅनॅलीसिस’ आणि ‘लाय डिटेक्टर’ अशा प्रकारच्या वैज्ञानिक चाचण्या करण्याच्या विचारात आहे.

‘एनआयए’ असमाधानी : मोघम उत्तरांमुळे वैज्ञानिक चाचण्या
डिप्पी वांकानी - मुंबई
कल्याणमधून पाच महिन्यांपूर्वी अचानक गायब होऊन इराकमध्ये ‘इसिस’ या कट्टर इस्लामी बंडखोर संघटनेसाठी लढायला गेलेला आरिफ माजिद तपासात मोघम उत्तरे देत असल्याने खरी माहिती काढण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) त्याच्या ‘नार्को अॅनॅलीसिस’ आणि ‘लाय डिटेक्टर’ अशा प्रकारच्या वैज्ञानिक चाचण्या करण्याच्या विचारात आहे. यासाठी न्यायालयाकडे लवकरच औपचारिक अर्ज केला जाईल, असे सूत्रंनी सांगितले. आरिफला शनिवारी विशेष न्यायालयाने 
8 डिसेंबर्पयत राष्ट्रीय तपास यंत्रणोच्या (एनआयए) कोठडीत ठेवण्याचा 
आदेश दिला.
 
न्यायालयात परवानगी मागणार
च्‘एनआयए’चे महानिरीक्षक रमा शास्त्री यांच्याशी दिल्ली मुख्यालयात संपर्क साधला असता त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले, आरिफ जे काही सांगेल ते हातात कागद-पेन घेऊन केवळ नोंदवून घेण्याचे काम आम्ही करणार नाही. खरे चित्र स्पष्ट होण्यासाठी त्याच्यावर अधिक अचूक अशा वैधानिक चाचण्या करण्यासाठी आम्ही न्यायालयाकडे परवानगी मागू.
च्शुक्रवारी आरिफ आमच्या ताब्यात आल्यापासून, न्यायालयात कस्टडीसाठी सादर करायची कागदपत्रे तयार करण्यात आम्ही व्यस्त होतो. आता त्याची कोठडी मिळाली असल्याने शनिवारी सायंकाळपासून त्याचे ख:या अर्थाने जाब-जबाब घेणो 
सुरू होईल.