‘इसिस’साठी गेला होता लढायला : गुप्तहेर संस्थेने तुर्कस्तानमधून परत आणले
डिप्पी वांकाणी - मुंबई
काही महिन्यांपूर्वी कल्याण येथून अचानक गायब होऊन इराक आणि सीरियात इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेने चालवलेल्या संघर्षात सामील झालेल्या चार तरुणांपैकी आरिफ माजिद हा तरुण रिसर्च अँड अनालीसिस विंग (रॉ) या हेर संस्थेच्या प्रयत्नांतून शुक्रवारी तुर्कस्थानमधून भारतात परतला आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. शनिवारी त्याला एनआयए कोर्टात हजर केले जाणार असल्याचे सुत्रंनी सांगितले.
आरिफला मुंबईत आणल्यानंतर काही तासांतच केंद्रीय गृहखात्याने त्याला अटक करण्याची सूचना एनआयएला केली. आरिफसह इसिस आणि या दहशतवादी संघटनेच्या हस्तकांविरोधात भा.दं.वि.च्या कलम 125 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तो दोषी सिद्ध झाल्यास आरिफला अधिकाधिक जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
आरिफला मुंबईत आणल्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली. तसेच त्याला सकाळी मुंबईत आणल्याचे सुरक्षा यंत्रणोकडून त्याच्या कुटुंबियांना कळवण्यात आले होते, असेही सुत्रंनी सांगितले.
शुक्रवारी दिवसभर एनआयएने आरिफला त्याने मे महिन्यात घर सोडण्यापासून आजवरच्या घटनाक्रमाबाबत विचारणा केली, असे सूत्रंनी सांगितले. मात्र त्याच्या परतण्याने बरेच प्रश्न उभे केले असून, त्याच्या तपासातून या तरुणांची माथी भडकवणा:यांचा तसेच त्यांना भारतात आणि इराकमध्ये साहाय्य करणा:यांचा छडा लागू शकतो.
कल्याणमधील आरिफ माजिद, शहीन टंकी, फहद शेख आणि अमान तांडेल हे चार जण 23 मे रोजी अन्य 22 जणांबरोबर इराकमधील धार्मिक स्थळांची तीर्थयात्र करण्याच्या निमित्ताने विमानाने बगदादला गेले होते.
दुस:या दिवशी आरिफने त्याच्या कुटुंबीयांना दूरध्वनी करून कळवले होते, की ते इराकला गेले आहेत आणि पूर्वसूचना न देता गेल्याबद्दल माफी मागितली होती. भारतात परतल्यावर त्यांच्या सहप्रवाशांनी हे चौघे बगदादहून टॅक्सी भाडय़ाने घेऊन इराकमधील फालुजा येथे गेल्याचे सांगितले होते. दरम्यान, यापैकी एकाच्या मृत्यूचेही वृत्त आले होते.
‘ते’ 39 भारतीय जिवंतच
इराकमधील इसिस या अतिरेकी संघटनेने ओलीस ठेवलेले 39 भारतीय अद्याप जिवंत असण्याची आशा सरकारने व्यक्त केली आहे. या लोकांना ठार मारण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही, असे विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभा आणि राज्यसभेत निवेदन देताना स्पष्ट केले. इसिस या इस्लामी गटाने ओलीस ठेवलेल्या 39 भारतीयांची हत्या करण्यात आल्याचा दावा एका वृत्तात करण्यात आल्यानंतर दोन्ही सभागृहांत विरोधकांनी चिंता व्यक्त केली.