Join us
Daily Top 2Weekly Top 5

अणुशास्त्रज्ञ सुरक्षित आहेत का?

By admin | Updated: June 28, 2015 00:54 IST

अणुशास्त्रज्ञांच्या आरोग्याची व सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली जाते की नाही? याचा खुलासा करणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य शासनाला दिले.

मुंबई : अणुशास्त्रज्ञांच्या आरोग्याची व सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली जाते की नाही? याचा खुलासा करणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य शासनाला दिले.या प्रकरणी चेतन कोठारी यांनी अ‍ॅड. आशीष मेहता यांच्यामार्फत जनहित याचिका केली आहे. गेल्या काही वर्षांत शास्त्रज्ञांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यामुळे याची विशेष तपास स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.न्या. व्ही. एम. कानडे व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. रेडिएशेनमुळे कर्करोग होऊ शकतो. अनेक घटनांमध्ये तसे आढढळले आहे. असे असताना याबाबत सातत्याने संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांची काळजी घेणे आवश्यक आहे. तेव्हा शासन अशा शास्त्रज्ञांच्या सुरक्षेसाठी नेमके काय करते, कोणती दक्षता घेते, हे त्यांनी प्रतिज्ञापत्रावर सादर करावे, असे आदेश देऊन न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली. (प्रतिनिधी)