Join us

लोकलच्या मालडब्यात आढळली अर्धनग्न महिला

By admin | Updated: November 18, 2015 03:08 IST

मंगळवारी सकाळी ठाणे ते सीएसटी धीम्या लोकलमधील मालडब्यात एक अर्धनग्न व शुद्ध हरविलेल्या अवस्थेत महिला आढळून आली. तिचे वय साधारण साठ वर्षे होते. काही प्रवाशांनी

मुंबई : मंगळवारी सकाळी ठाणे ते सीएसटी धीम्या लोकलमधील मालडब्यात एक अर्धनग्न व शुद्ध हरविलेल्या अवस्थेत महिला आढळून आली. तिचे वय साधारण साठ वर्षे होते. काही प्रवाशांनी साखळी खेचून मुलुंड स्थानकात लोकल थांबविल्यानंतर या महिलेची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर या महिलेला कपडे देवून तिच्या विनंतीनुसार तिला कल्याणला जाणाऱ्या लोकलमधून पाठविण्यात आले. यात रेल्वे पोलिसांनी महिलेची सखोल चौकशी का केली नाही, तीची वैद्यकीय तपासणी का करण्यात आली नाही असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या विषयी कुर्ला जीआरपीशी संपर्क साधला असता, ती महिला बेघर होती आणि ती नशेत होती. तिला कल्याणला जायचे होते आणि तिला कपडे घालून कल्याणला पाठविण्यात आल्याचे सांगितले. याबाबत मध्य रेल्वे जीआरपीचे पोलिस उपायुक्त रुपाली अंबुरे यांना विचारले असता, ती ७0 ते ८0 वयोगटातील महिला होती अशी माहिती कुर्ला जीआरपीकडून आपल्याला देण्यात आल्याचे सांगितले. अर्धनग्न अवस्थेत असलेली ही महिला बेघर होती,अशी माहिती दिली. सविस्तर माहितीसाठी वारंवार फोन केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. (प्रतिनिधी)