Join us

अरबाज, सोहेलसह तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:14 IST

अरबाज, सोहेलसह तिघांवर गुन्हा दाखललोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभिनेता सलमान खान याचे भाऊ सोहेल तसेच अरबाज यांच्यावर ...

अरबाज, सोहेलसह तिघांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अभिनेता सलमान खान याचे भाऊ सोहेल तसेच अरबाज यांच्यावर खार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोगप्रतिबंधक कायद्यांतर्गत हा गुन्हा सोमवारी दाखल करण्यात आला असून, पालिकेच्या एच पश्चिम विभागाने या प्रकरणी तक्रार केली आहे.

सोहेल खान, अरबाज खान व निर्वाण खान हे २५ डिसेंबर, २०२० रोजी यूएईवरून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले होते. त्यांना संस्थात्मक विलगीकरणासाठी महापालिकेने ताज लँड एण्ड्स या वांद्रे पश्चिमच्या हॉटेलमध्ये बुकिंग केले होते. नियमानुसार तेथे त्यांनी सात दिवस राहणे अपेक्षित होते. मात्र ते त्या तारखेला हॉटेलमध्ये दाखल न होता खार येथील आपल्या घरी रवाना झाले. ह्याची माहिती पालिकेच्या एच पश्चिम विभागाला कळताच त्यांनी खान बंधूंविरोधात गुन्हा नोंद केला आहे.