Join us
Daily Top 2Weekly Top 5

कामगार उपायुक्तपदी सहा अधिकाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:07 IST

मुंबई : कामगार आयुक्त आस्थापनेवरील सहा सहायक कामगार आयुक्तांची कामगार उपआयुक्त या पदावर तात्पुरती पदोन्नती करण्यात आली आहे. कामगार ...

मुंबई : कामगार आयुक्त आस्थापनेवरील सहा सहायक कामगार आयुक्तांची कामगार उपआयुक्त या पदावर तात्पुरती पदोन्नती करण्यात आली आहे. कामगार विभागाने याबाबतचा शासननिर्णय जारी केला असून संबंधित अधिकाऱ्यांना आपापल्या पदावर तातडीने रुजू होण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

अमरावतीचे विद्यमान उपायुक्त वि. रा. पानबुडे हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीनंतर नवीन उपायुक्तांनी पदभार घ्यायचा आहे. उर्वरित पाचही अधिकाऱ्यांना विद्यमान पदावरून तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले असून तातडीने पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अधिकारी - पदोन्नतीनंतरचे ठिकाण

१) भ.मा.आंधळे - कामगार उपायुक्त, मुंबई उपनगर

२) सं. बं. व्हनाळकर -अध्यक्ष, मुंबई लोखंड व पोलाद बाजार कामगार मंडळ, मुंबई

३) चं. अ. राऊत. - कामगार उपायुक्त, औरंगाबाद

४) नीलांबरी भोसले - कामगार उपायुक्त, मुंबई शहर

५) वि. ना. माळी - कामगार उपायुक्त, नाशिक

६) नि. पां. पाटणकर - कामगार उपायुक्त, अमरावती