Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमोल जाधव यांची नियुक्ती

By admin | Updated: January 22, 2017 02:44 IST

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीमध्ये अमोल जाधव यांची प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यक्रमात ही घोषणा

मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चातर्फे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीमध्ये अमोल जाधव यांची प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यक्रमात ही घोषणा केली.जाधव हे गेली १५ वर्षे भारतीय जनता पार्टीत कार्यरत असून, त्यांनी याअगोदर भारतीय जनता युवा मोर्चाच्या विविध पदांवर काम केलेले आहे. ‘भाजयुमो’च्या दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष पदावर असताना त्यांनी २०१४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उल्लेखनीय कार्य केले आहे. (प्रतिनिधी)