कल्याण : गणेशोत्सव काळात अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना महावितरणने कारवाईचा इशारा दिला आहे. तात्पुरत्या वीजजोडणीसाठी रीतसर अर्ज करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. गणेशोत्सव काळात काही मंडळांकडून चोरून वीज घेण्याचे प्रकार घडत असतात. अशा गणेश मंडळांवर वॉच ठेवण्यासाठी महावितरणने मागील वर्षी विशेष पथके तैनात केली होती. यंदाही ही विशेष मोहीम राहणार असल्याने चोरून वीज घेणाऱ्या गणेश मंडळांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, त्वरित वीजजोडणी हवी असल्यास महावितरणच्या कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही वीज घरगुती दरापेक्षा कमी दरात देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. आता या आवाहनाला किती मंडळे सकारात्मक प्रतिसाद देतात, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)
वीजजोडणीसाठी रीतसर अर्ज करा
By admin | Updated: August 15, 2014 01:57 IST