Join us  

पाच टक्के मुस्लीम आरक्षण लागू करा - काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 3:11 AM

मुस्लीम समाजाच्या प्रगतीची खरोखरच चिंता असेल तर गेली पाच वर्षे जाणीवपूर्वक टाळत असलेले पाच टक्के मुस्लीम आरक्षण लागू करण्याचे आदेश या सरकारने द्यावेत

मुंबई : मोदी सरकारने अल्पसंख्याकांकरिता मदरशांचे आधुनिकीकरण तसेच शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्र सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत करीत असतात, परंतु या निर्णयाचे त्यांनी अजूनपर्यंत स्वागत का केले नाही, असा सवाल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे.

मुस्लीम समाजाच्या प्रगतीची खरोखरच चिंता असेल तर गेली पाच वर्षे जाणीवपूर्वक टाळत असलेले पाच टक्के मुस्लीम आरक्षण लागू करण्याचे आदेश या सरकारने द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली. ते म्हणाले, २०१३ साली काँग्रेस आघाडी सरकारने मदरशांच्या आधुनिकीकरणाचा निर्णय घेतला होता. या निर्णयामध्ये मदरशांच्या इमारतींचे नूतनीकरण, प्रयोगशाळा आणि ग्रंथालयासाठी अनुदान देण्यात आले होते. याचबरोबर पारंपरिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी व इंग्रजी शिकविण्यासाठी डीएड व बीएड शिक्षकांनाही मानधन देण्यात येणार होते. मदरशांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु या निर्णयाला देवेंद्र फडणवीस यांनी विरोध करीत धार्मिक संस्थांना अनुदान देणे हे असंविधानिक आहे, असे म्हटले होते; तर उद्धव ठाकरे यांनी तर मुलतत्त्ववादी कोण, असा सवाल उपस्थित केला होता.

टॅग्स :सचिन सावंतकाँग्रेसमुस्लीम