मुंबई : भारतीय टपाल विभागाच्या वतीने मुंबई दक्षिण विभागातील काही टपाल कार्यालयांत बाह्य पोस्टल दलाल पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदासाठीची नेमणूक तात्पुरत्या स्वरूपावर असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज विहित नमुन्यात उपविभागीय डाक निरीक्षक, मुंबई दक्षिण विभाग, मुंबई जी. पी. ओ. अॅनेक्स बिल्डिंग, ५ वा मजला, मुंबई ४0000१ या पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन टपाल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अर्ज पाठवण्याची मुदत २० फेब्रुवारी २०१७ अशी आहे. काळबादेवी, गिरगाव, नरिमन पॉइंट, कुलाबा, मरिन लाइन्स आणि मंत्रालय या टपाल कार्यालयात बाह्य पोस्टल दलाल पदासाठी भरती आहे. बाह्य पोस्टल दलाल हे पद कायम स्वरूपाचे अथवा राखीव नसल्याने, सर्व जाती-जमातीचे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.(प्रतिनिधी)
टपाल विभागात भरतीसाठी अर्ज
By admin | Updated: February 16, 2017 02:33 IST