Join us
Daily Top 2Weekly Top 5

विषय समित्यांच्या सभापतीपदांसाठी अर्ज

By admin | Updated: August 7, 2014 00:56 IST

महापालिका विषय समित्यांच्या सभापती व उपसभापती पदासाठी बुधवारी अर्ज भरणा प्रक्रिया झाली. याची निवड प्रक्रिया गुरुवारी विशेष बैठकीत होणार आहे.

नवी मुंबई : महापालिका विषय समित्यांच्या सभापती व उपसभापती पदासाठी बुधवारी अर्ज भरणा प्रक्रिया झाली. याची निवड प्रक्रिया गुरुवारी विशेष बैठकीत होणार आहे.
 महापालिकेच्या सात विषय समित्यांच्या सभापती व उपसभापती पदासाठी नव्याने निवड प्रक्रिया होणार आहे. त्यानुसार बुधवारी महापालिका मुख्यालयात अर्ज भरणा प्रक्रिया झाली. यावेळी केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच उमेदवारांनी आपले अर्ज प्रशासनाकडे सादर केले. त्यामध्ये महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी स्वाती गुरखे, उपसभापती पदासाठी मोनिका पाटील, आरोग्य समिती सभापती पदासाठी संदीप सुतार, उपसभापती पदासाठी शिल्पा मोरे, पाणीपुरवठा समिती सभापती पदासाठी नवीन गवते, उपसभापती पदासाठी इंदुमती तिकोणो यांनी अर्ज भरले. तर क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती पदासाठी शंकर मोरे, उपसभापती पदासाठी बाळकृष्ण पाटील, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती सभापती पदासाठी वंदना सोनवणो, उपसभापती पदासाठी चंद्रकांत पाटील (महापे), विधी समिती सभापती पदासाठी न्हानू तेली, उपसभापती पदासाठी सुरेखा इथापे यांनी अर्ज भरले आहेत. त्याचप्रमाणो परिवहन समितीच्या सभापती पदासाठी गणोश म्हात्रे यांनी अर्ज भरला आहे. या उमेदवारांच्या विरोधात इतर पक्षातून अर्ज भरण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सभापती व उपसभापती पदाची ही निवड प्रक्रिया बिनविरोध होणार आहे. महापालिका मुख्यालयात गुरुवारी होणा:या विशेष बैठकीत त्यांची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. (प्रतिनिधी)