मुंबई : महाराष्ट्र माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे होणा-या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरीत्या बसणा-या विद्यार्थ्यांना २३ नोव्हेंबरपासून आॅनलाइन अर्ज भरता येणार आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात बारावी आणि दहावीच्या परीक्षा सुरू होणार असून, ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज क्रमांक १७ भरला होता, त्याची छाननी करून विद्यार्थ्यांना मेसेज पाठवण्यात आले आहेत.दहावी-बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या बसू इच्छिणाºया विद्यार्थ्यांना विभागीय मंडळांकडे अर्ज करण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले होते. आलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ईमेल अथवा मेसेज करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांना ईमेल अथवा मेसेज आले आहेत, त्यांना २३ नोव्हेंबरपासून अर्ज भरता येणार आहेत.
दहावी-बारावी परीक्षेसाठी २३ नोव्हेंबरपासून अर्ज उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 05:48 IST