Join us  

गोराई पोलिसांकडून माणूसकीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 6:07 PM

आठशे आदिवासींना मदतीचा हात 

मुंबई : कोरोना बाधितांची संख्या देशासह राज्यात दिवसेंदिवस वाढत असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे पर्यटन आणि वेगवेगळ्या स्तरावरील रोजगार थंडावला असून दूर आदिवासी पाड्यात राहणाऱ्या आदिवासींची अवस्था तर बिकट झाली आहे. इथल्या वेगवेगळ्या सहा पाड्यांतील सुमारे ८०० आदिवासींचे हाल पाहून गोराई पोलिसांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला आहे. यामुळे गोराई पोलिसांकडून माणूसकीचे दर्शन घडले आहे.

 

गोराई समुद्रकिनारा पर्यटनस्थळ म्हणून लोकप्रिय ठरले असले तरीही संचारबंदीने इथे सगळेच चित्र बदलले आहे. बोरिवली पश्चिमेकडील गोराई खाडी ओलांडून पुढे गेल्यास मुंडा पाडा, जामदारपाडा, छोटी डोंगरी, मोठी डोंगरी बाबरी पाडा, आदिवासी पाड्यासारख्या छोट्या वस्त्या आहेत. आदिवासींचे वास्तव्य असलेल्या या पाड्यात संचारबंदीमुळे रोजच्या खाण्यापिण्याची आबाळ सुरू झाली आहे. रोजगार नसल्याने जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला असून त्यातील काहींनी गोराई पोलिसांसमोर ही व्यथा मांडली. यासाठी गोराईचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव नारकर यांनी पुढाकार घेवून मदत केली. 

टॅग्स :पोलिसकोरोना सकारात्मक बातम्या