Join us

प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:09 IST

मुंबई : जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन, मंत्रालय, भारत सरकारने जलसंवर्धन व व्यवस्थापन करणाऱ्या राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, ...

मुंबई : जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन, मंत्रालय, भारत सरकारने जलसंवर्धन व व्यवस्थापन करणाऱ्या राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, शाळा, उद्योग, अशासकीय संघटना अशा घटकांकडून विविध श्रेणींमध्ये ‘राष्ट्रीय जल पुरस्कार २०२०’साठी १० फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव मागविले आहेत.

.........................

सूर्योदय काव्य पुरस्कारासाठी आवाहन

मुंबई : साहित्य क्षेत्रातील अग्रेसर नोंदणीकृत सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या नाशिक शाखेच्या वतीने मंडळाच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त २०१९-२० या वर्षी मराठीत प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय साने गुरुजी सूर्योदय काव्य पुरस्कार देण्यात येणार आहे. रुपये दोन हजार, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बक्षीस वितरण नोव्हेंबर २०२१ मध्ये करण्यात येईल. स्पर्धेसाठी कुठल्याही प्रकारचे प्रवेश शुल्क नाही.

..............................

रांगोळी स्पर्धेत दीपिका लवटे प्रथम

मुंबई : मैत्री फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने रांगोळी कलेला प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत दीपिका लवटे या महिलेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच द्वितीय क्रमांक प्राची ढमाले आणि तृतीय क्रमांक प्रणाली फडतरे यांनी पटकाविला आहे. या स्पर्धेसाठी पुणे विद्याभवनाच्या अध्यापिका मेघराणी जोशी यांनी योगदान दिले.

................