Join us
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक आजाराने त्रस्त गरीब रुग्णांना अन्नधान्य मदतीसाठी आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:06 IST

मुंबई : मानसिक आजाराने त्रस्त गरीब रुग्णांना या महिन्यापासून गृहउपयोगी वस्तूंचे वाटप मानसोपचार विभाग, नायर रुग्णालय येथे सुरू आहे. ...

मुंबई : मानसिक आजाराने त्रस्त गरीब रुग्णांना या महिन्यापासून गृहउपयोगी वस्तूंचे वाटप मानसोपचार विभाग, नायर रुग्णालय येथे सुरू आहे. या अंतर्गत, प्रथमतः १० गरीब रुग्णांना / त्यांच्या नातेवाइकांसाठी धान्य वाटप करण्यात आले. तसेच मानसिक आजाराने त्रस्त गरीब रुग्णांना अन्नधान्य मदतीसाठी आवाहन करण्यात आले.

५ किलो तांदूळ, ५ किलो गहू, १ किलो मूग डाळ, १ किलो साखर, १ किलो मीठ, पाव किलो चहा पावडर, १ पाकीट हळद, १ लिटर खाद्य तेल इत्यादी. तसेच, टूथपेस्ट आणि सॅनिटरी पॅडस् अशा वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित गोष्टी या रुग्णांना देण्याचाही मानस आहे. या जीवनावश्यक वस्तूंच्या किटचा खर्च ७०० रुपये इतका आहे. ही योजना सद्यस्थितीत आटोक्यात येईपर्यंत सातत्याने राबविण्याचा हेतू असून, या कामाकरिता लोकांनी आपली मदत पैशाच्या रूपात केल्यास त्याचा विनियोग या गरीब रुग्णांपर्यंत अन्नधान्य पोहोचविण्याच्या रूपाने करता येईल. यासंदर्भात मदतीसाठी आणि अधिक माहितीसाठी बा.य.ल. नायर धर्मदाय रुग्णालयाच्या मानसोपचार विभागात कार्यरत असलेले समाज विकास अधिकारी अजिंक्य गणेश पाचारकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

..........................