Join us  

अ‍ॅप बेस टॅक्सी चालकांच्या संपाबाबत आज होणार फैसला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 5:33 AM

गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या अ‍ॅप बेस टॅक्सी संपाला सुमारे ९० टक्के चालक-मालकांनी प्रतिसाद दिल्याचा दावा संघटनेने केला आहे.

मुंबई : गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या अ‍ॅप बेस टॅक्सी संपाला सुमारे ९० टक्के चालक-मालकांनी प्रतिसाद दिल्याचा दावा संघटनेने केला आहे. अ‍ॅप बेस टॅक्सी संपाबाबत पुढील भूमिका ठरवण्यास बुधवारी बैठक होणार असून, यात संपाबाबत निर्णय होणार आहे.संपाबाबत महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचे सचिव सुनिल बोरकर म्हणाले की, ओला-उबरसारख्या अ‍ॅप बेस टॅक्सी संपाबाबत ओला कंपनीने संप मागे घेण्याची विनंती केली. पण मागण्यांबाबत त्यांनी कोणतेही लेखी आश्वासन दिले नाही. यामुळे तूर्तास संप सुरूच राहणार आहे. बुधवारी दुपारी दीड वाजता बैठक वरळी येथे आयोजित केली असून, या बैठकीअंती संप सुरू ठेवायचा की, मागण्या पूर्ण झाल्यानंतर मागे घ्यायचा, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. बैठकीनंतर मुंबईतील टोल नाक्यांवर चक्काजाम करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.उबर मुंबईतील चालक-मालकांना योग्य उत्पन्न आणि प्रवाशांच्या सोईनुसार व्यवसाय देणार असल्याचे उबर प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील उबर कार्यालय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बंद करण्यात आल्याचा दावा उबर अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. ‘भागीदारांसोबत चर्चा करून प्रश्न सोडवू,’ असे ओला कंपनीच्या प्रवक्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :टॅक्सी