Join us  

युग तुलीचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 2:01 AM

कमला मिल आग प्रकरणी मोजोस बिस्ट्रोचा सहमालक व फरारी आरोपी युग तुलीचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी सत्र न्यायालयाने फेटाळला. २९ डिसेंबर रोजी कमला मिल कंपाउंडला लागलेली आग मोजोस बिस्ट्रोमुळे लागली नाही.

मुंबई : कमला मिल आग प्रकरणी मोजोस बिस्ट्रोचा सहमालक व फरारी आरोपी युग तुलीचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी सत्र न्यायालयाने फेटाळला. २९ डिसेंबर रोजी कमला मिल कंपाउंडला लागलेली आग मोजोस बिस्ट्रोमुळे लागली नाही. वन अबव्हमध्ये आधी आग लागली. त्यामुळे मोजोस बिस्ट्रोच्या मालकांना दोष देता येणार नाही, असे तुलीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. अग्निशमन दलाच्या अहवालानुसार व प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला आग मोजोस बिस्ट्रोला लागली. हुक्का पार्लरमुळे ही आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या प्रथमदर्शनी अहवालात म्हटले आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला.युग तुलीच्या जामीन अर्जाला विरोध करणारा मध्यस्थी अर्ज पीडिता पारुल लकडावाला हिच्या पतीने न्यायालयात दाखल केला. पोलिसांनी आधीच मोजोस बिस्ट्रोचा मालक युग पाठकला अटक केली आहे. या दोघांवरही भारतीय दंड संहिता कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), ३३८ (दुस-याचे जीवन व सुरक्षा धोक्यात घालणे) याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. २९ डिसेंबर रोजी कमला मिल कंपाउंडमधील मोजोस बिस्ट्रो व वन अबव्ह पब्सला लागलेल्या आगीमुळे १४ जणांचा मृत्यू झाला.

तुलीच्या शोधासाठी पाच पथके मुंबईबाहेरकमला मिल आग प्रकरणी वन अबव्हचे तीन संचालक क्रिपेश संघवी, जीगर संघवी, अभिजित मानकर आणि मोजोज् बिस्टोच्या युग पाठकला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील पसार युग तुलीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांची पाच पथके मुंबईबाहेर रवाना झाली आहेत. यात हैदराबादसह विविध ठिकाणांचा समावेश आहे.कमला मिल आग प्रकरणी हॉटेल व्यावसायिक विशाल कारियाच्या अटकेनंतर वन अबव्हचे तीन संचालक पोलिसांच्या जाळ्यात अडकले. कारियाचीही वन अबव्हमध्ये भागीदारी असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेने त्यांचा अधिक तपास सुरू आहे. तर दुसरीकडे मोजोज् बिस्टोच्या पसार युग तुलीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांची पाच पथके मुंबईबाहेर रवाना झाली आहेत. तो हैदराबादला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सध्या हैदराबादमध्ये पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहे.चौकशी सुरूपोलिसांनी वन अबव्हचे संचालक आणि मोजोज् बिस्टोची समोरासमोर चौकशीला सुरुवात केली. दोघांवरील आरोपांबाबत चौकशी करण्यात येत आहे. दोघांजवळील कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी दिली.

टॅग्स :न्यायालयकमला मिल अग्नितांडव