Join us
Daily Top 2Weekly Top 5

...अन् सावली साथ साेडून जाणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:07 IST

शून्य सावली दिवस : १५ मे राेजी मुंबई, नवी मुंबई, कर्जत, माथेरानवासीयांना येणार प्रत्यक्ष अनुभवलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई ...

शून्य सावली दिवस : १५ मे राेजी मुंबई, नवी मुंबई, कर्जत, माथेरानवासीयांना येणार प्रत्यक्ष अनुभव

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शून्य सावली दिवस म्हणजे या दिवशी आपल्यासोबत वर्षभर राहणारी सावली आपल्याला काही मिनिटांसाठी सोडून जाते. मुंबईत हा योग १५ मे रोजी येणार आहे.

महाराष्ट्रात ३ मे ते ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस येतात. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे ३ मे रोजी तर धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येतो. भारतातील मध्य प्रदेशातील भोपाळ जवळून २३.५० अंशावरून कर्कवृत गेले आहे, त्यामुळे शून्य सावलीचा हा शेवटचा भूभाग आहे. त्यामुळेच भारतात २३.५० अंशाच्या पुढे दिल्ली, हिमाचल, काश्मीर येथे कुठेही शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता येत नाही.

कोल्हापूर जिल्ह्यात १५.६ अक्षांश ते धुळे जिल्ह्यात २१.९८ अक्षांशादरम्यान शून्य सावली दिवस पाहता येणार आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे दुपारी १२ ते १२.३५ या वेळेदरम्यान सूर्य निरीक्षण करावे, असे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले. शून्य सावलीचा अनुभव घेण्यासाठी उन्हात सरळ उभे रहावे. ठरावीक दिवशी व ठरावीक वेळी सूर्य अगदी डोक्यावर आला की सावली दिसत नाही.

तारीख : शहरे

३ मे - सावंतवाडी, मांगेली, खूषगेवाडी

४ मे - मालवण, आंबोली

५ मे - देवगड, राधानगरी, रायचूर

६ मे - कोल्हापूर, इचलकरंजी,

७ मे - रत्नागिरी, सांगली, मिरज

८ मे - कऱ्हाड, जयगड, अफजलपूर

९ मे - चिपळूण, अक्कलकोट

१० मे - सातारा, पंढरपूर, सोलापूर

११ मे - महाबळेश्वर, फलटण, तुळजापूर, वाइ

१२ मे - बारामती, बार्शी, उस्मानाबाद

१३ मे - पुणे, मुळशी, दौड, लातूर, लवासा

१४ मे - लोणावळा, अलिबाग, दाभाडे, पिंपरी - चिंचवड, देहू, जामखेड, आंबेजोगाई

१५ मे - मुंबई, नवी मुंबई, कर्जत, बीड, माथेरान, राळेगण सिद्दी, सिरोंचा

१६ मे - बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर, नारायण गाव, खोडद, अहमदनगर, परभणी, नांदेड, निर्मल

१७ मे - नालासोपारा, विरार, आसनगाव, अहेरी, आल्लापल्ली

१८ मे - पालघर, कसारा, संगमनेर, अंबाड, हिंगोली, मूलचेरा

१९ मे - औरंगाबाद, डहाणू, नाशिक, कोपरगाव, वैजापूर, जालना, पुसद, बल्लारशा, चामोर्शी

२० मे - चंद्रपूर, मेहकर, वाशीम, वणी, मूल

२१ मे - मनमाड, चिखली, गडचिरोली, सिंदेवाही, रोहना

२२ मे - मालेगाव, चाळीसगाव, बुलडाणा, खोपोली, यवतमाळ, आरमोरी

२३ मे - खामगाव, अकोला, देसाईगंज, ब्रह्मपुरी, नागभीड

२४ मे - धुळे, जामनेर, शेगाव, वर्धा, उमरेड, दर्यापूर

२५ मे - जळगाव, भुसावळ, अमरावती, अंमळनेर, तेल्हारा

२६ मे - नागपूर, भंडारा, परतवाडा, चोपडा

२७ मे - नंदुरबार, शिरपूर, बुऱ्हाणपूर, परतवाडा, चिखलदरा, तुमसर, गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक

२८ मे - अक्कलकुआ, शहादा, पांढुरणा, वरुड, नरखेड

२९ मे - बोराड, नर्मदा नगर

३० मे - धाडगाव

३१ मे - तोरणमाळ

.............................