मुंबई : जानेवारी २०१९ मध्ये मुंबईत दुसरी वातानुकूलित लोकल दाखल होणार आहे. यामुळे वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची प्रवाशांची मागणी पूर्ण झाल्याचे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार गुप्ता यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा बलाच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी महालक्ष्मी येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सध्याच्या एसी लोकलमध्ये त्रुटी असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून आल्या आहेत. नव्याने दाखल होणाºया लोकलमध्ये या त्रुटी दूर करण्यात येतील, असे अनिल कुमार गुप्ता यांनी सांगितले.
जानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 06:43 IST