Join us  

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात धावणार दुसरी एसी लोकल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 6:44 AM

मुंबईकरांची दुसऱ्या एसी लोकलची प्रतीक्षा नववर्षात संपणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर १२ डब्यांची दुसरी एसी लोकल चालविली जाणार आहे.

मुंबई : मुंबईकरांची दुसऱ्या एसी लोकलची प्रतीक्षा नववर्षात संपणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर १२ डब्यांची दुसरी एसी लोकल चालविली जाणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांच्या सेवेत ही एसी लोकल रुजू होईल. रेल्वेच्या चेन्नई येथील इंटिग्रल कोच कारखान्यात तिच्या बांधणीचे काम पूर्ण झाले आहे. ही लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात येणार असून यामुळे पश्चिम रेल्वेमार्गावर आता दोन एसी लोकल धावतील.रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना दुसºया एसी लोकलची भेट मिळणार आहे. विशेष म्हणजे या नव्या गाडीत काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार या लोकलमध्ये आकर्षक रंगसंगती असेल. मेल, एक्स्प्रेसप्रमाणे एका डब्यातून दुसºया डब्यात जाण्याची सोय आहे. पहिल्या एसी लोकलमध्ये दरवाजे उघड-बंद होण्यासाठी अधिक वेळ लागत होता. मात्र दुसºया एसी लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजा उघड-बंद होण्यासाठीचा वेळ कमी होणार आहे.‘थंडगार प्रवास’ म्हणून पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल ओळखली जाते. २५ डिसेंबर २०१७ रोजी पहिली एसी लोकल पश्चिम रेल्वेमार्गावर धावली. वर्षभरात या एसी लोकलमधून तब्बल ४० लाख प्रवाशांनी प्रवास केला. या लोकलमुळे पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत १६ कोटी ६५ लाख रुपये जमा झाले आहेत. या १२ डब्यांच्या एसी लोकलच्या दिवसातून १२ फेºया होतात. सहा गाड्या अप आणि सहा डाऊन मार्गावर धावतात. आता दुसरी एसी लोकल आल्याने प्रवाशांच्या सोयीनुसार या फेºया वाढविण्यात येतील. 

टॅग्स :एसी लोकल