Join us  

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ; आज २,१२,५७९ जणांना मिळणार पदव्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 5:51 AM

Mumbai University : यावर्षीच्या दीक्षान्त समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण २ लाख १२ हजार ५७९ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत.

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ २७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या दीक्षान्त समारंभाचे अध्यक्षस्थान राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी भूषवणार आहेत तर सन्माननीय अतिथी म्हणून पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत,  उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेचे संचालक प्रा. सुनील कुमार सिंह उपस्थितीत राहणार आहेत. 

ज्या स्नातकांनी पदव्यांसाठी आणि पदविकांसाठी स्वतःची पात्रता सिद्ध केली आहे. त्यांना पदवी प्रदान करण्यासाठी या दीक्षान्त समारंभाचे आयोजन केले आहे. यावर्षीच्या दीक्षान्त समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण २ लाख १२ हजार ५७९ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत.

यामध्ये १ लाख ९ हजार १७३ मुले तर १ लाख ३ हजार ४०६ मुलींचा समावेश आहे. पदवीसाठी १ लाख ७९ हजार ७०६ तर पदव्युत्तरसाठी ३२ हजार ८७३ विद्यार्थ्यांना पदव्यांचा समावेश आहे तसेच मुलींमध्ये पदवी स्नातकांची संख्या ८३ हजार १५८ आणि पदव्युत्तर स्नातकांसाठी २० हजार २४८ एवढी आहे. 

टॅग्स :मुंबई विद्यापीठ