Join us

राज्य साहित्य पुरस्कारांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:30 IST

राज्य साहित्य पुरस्कारांची घोषणाश्रीपाल सबनीस, अच्युत गोडबोले, हमीद दाभोळकरांसह ३४ जण मानकरीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य ...

राज्य साहित्य पुरस्कारांची घोषणा

श्रीपाल सबनीस, अच्युत गोडबोले, हमीद दाभोळकरांसह ३४ जण मानकरी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य सरकारकडून उत्कृष्ट मराठी साहित्यनिर्मितीसाठी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ‌्मय पुरस्कार दिले जातात. विविध साहित्य प्रकारांसाठी २०१९ सालच्या पुरस्कारांची गुरुवारी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत घोषणा करण्यात आली.

मंत्रालयात मराठी भाषा पंधरवडा कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या ३४ पुरस्कारांची घोषणा यावेळी करण्यात आली. यावेळी मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, विधानमंडळातील मराठी भाषा समितीप्रमुख चेतन तुपे, कलाशिक्षक गोपाल वाकोडे, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजीत डिसले उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त सर्व विजेत्यांचे अभिनंदन करतानाच या साहित्यिकांनी मराठी भाषा संवर्धन व वृद्धीसाठी मराठी भाषा विभागाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा मंत्री देसाई यांनी व्यक्त केली. स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ‌्मय पुरस्कार या योजनेअंतर्गत २०१९ च्या पुरस्कार स्पर्धेसाठी एकूण १०७३ प्रवेशिका आल्या. यातील ८४ प्रवेशिका नियमात बसत नसल्याने बाद झाल्या, तर उर्वरित ९८९ पुस्तके परीक्षणासाठी पाठविण्यात आली. परीक्षकांच्या निर्णयानुसार २०१९ या वर्षाकरिता राज्य वाङ‌्मय पुरस्कारासाठी साहित्यिक, लेखाकांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. डॉ. श्रीपाल सबनीस यांना आदिवासी प्रतिभावंतांचे मराठी साहित्य यासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, अच्युत गोडबोले यांना अनर्थ विकासनीती : सर्वनाशाच्या उंबरठ्यावर? या पुस्तकासाठी पंजाबराव देशमुख पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तसेच हमीद दाभोलकरांसह ३४ साहित्यिकांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत.

जास्तीत जास्त एक लाख रुपये आणि किमान ५० हजार रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र पात्र साहित्यिकांना थेट घरपोच प्रदान करण्यात येणार आहेत, तर पारितोषिकाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

* २०१९ या वर्षाकरिता पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे -

कवी केशवसूत पुरस्कार - मंगेश नारायणराव काळे

बहिणाबाई चौधरी पुरस्कार - संदीप शिवाजीराव जगदाळे

राम गणेश गडकरी पुरस्कार- शफाअत खान

विजय तेंडुलकर पुरस्कार - अनुप जत्राटकर

हरी नारायण आपटे पुरस्कार - मनोज बोरगावकर

श्री.ना.पेंडसे पुरस्कार - ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर

दिवाकर कृष्ण पुरस्कार -धर्मराज निमसरकर

ग.ल. ठोकळ पुरस्कार - डॉ. विजय जाधव

अनंत काणेकर पुरस्कार- नयना सहस्रबुद्धे

ताराबाई शिंदे पुरस्कार - डॉ. ऐश्वर्या रेवडकर

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार - प्रा.अनिल सोनार

न.चिं.केळकर पुरस्कार - अनिता पाटील

लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार- अशोक राणे

श्री. के. क्षीरसागर पुरस्कार - नीलिमा गुंडीगत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार - डॉ. हमीद दाभोलकर

शाहू महाराज पुरस्कार -गोपाळ चिप्पलकट्टी

नरहर कुरुंदकर पुरस्कार - खंडेराव कुलकर्णी

महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार - डॉ.व्ही.एन. शिंदे

वसंतराव नाईक पुरस्कार - रमेश जाधव

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार - डॉ. श्रीपाल सबनीस

सी.डी. देशमुख पुरस्कार- डॉ. गुरुदास नूलकर

ना.गो. नांदापूरकर पुरस्कार - मनीषा बाठे

कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार - परेश जयश्री मनोहर व संतोष शेंडकर

डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार-अच्युत गोडबोले

रा.ना. चव्हाण पुरस्कार -संपादक श्याम माधव धोंड

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार - अनुवादक माधव वझे

भाई माधवराव बागल पुरस्कार - डॉ. सुरेश हावरे

बालकवी पुरस्कार - विलास कांतिलाल मोरे

भा.रा. भागवत पुरस्कार - सुनंदा गोरे

साने गुरुजी पुरस्कार - बबन मिंडे

राजा मंगळवेढेकर पुरस्कार - स्वाती राजे

यदुनाथ थत्ते पुरस्कार- विजय तांबे

ना.धों. ताम्हणकर पुरस्कार -आशा बोकील

सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार - अदिती बर्वे