Join us

अंकुश चौधरी प्रस्तुत करणार नाटक; लवकरच रंगभूमीवर येणार मराठी नाटक 'बैदा'

By संजय घावरे | Updated: March 15, 2024 20:12 IST

आजवर रंगमंचावर अभिनय करणारा अंकुश आता प्रस्तुतकर्ता बनला आहे.

मुंबई: मराठी रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत सर्वच ठिकाणी आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अंकुश चौधरी आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. आजवर रंगमंचावर अभिनय करणारा अंकुश आता प्रस्तुतकर्ता बनला आहे.

संदीप दंडवते लिखित-दिग्दर्शित 'बैदा' हे मराठी नाटक अंकुश प्रस्तुत करणार आहे. १६ मार्चला हे नाटक रंगभूमीवर येणार आहे. नाट्य मल्हार निर्मित या दोन अंकी नाटकात उन्नती कांबळे, अक्षय काळकुटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. स्वतःसाठी कुटुंबासाठीचा लढा... अशी टॅगलाईन असलेले हे कौटुंबिक नाटक आहे.

मराठी रंगभूमीवर नवीन जबाबदारी स्वीकारण्याबाबत अंकुश म्हणाला की, बऱ्याच दिवसांपासून एखादे चांगले नाटक प्रस्तुत करण्याची इच्छा होती. याच दरम्यान दंडवतेंचे 'बैदा' हे नाटक पाहिले. उत्तम सादरीकरण, अतिशय चांगला विषय असलेले हे नाटक जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे, असे मनापासून वाटल्याने या नाटकाचा भाग झालो. या नाटकाच्या माध्यमातून प्रथमच प्रस्तुतकर्ता म्हणून प्रेक्षकांसमोर येणार असल्याचेही अंकुश म्हणाला.

टॅग्स :मुंबईअंकुश चौधरी