Join us

अनिल कोकीळ, अनंत नर यांची बिनविरोध निवड

By admin | Updated: March 17, 2017 05:09 IST

बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी अनिल कोकीळ तर सुधार समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे अनंत (बाळा) नर यांची वर्णी लागली आहे.

मुंबई : बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी अनिल कोकीळ तर सुधार समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे अनंत (बाळा) नर यांची वर्णी लागली आहे. कोकीळ आणि नर यांनी मंगळवारी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते. निवडणुकीत पीठासीन अधिकारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी कोकीळ यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांना बिनविरोध विजयी घोषित केले. महापालिकेच्या सुधार समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे अनंत (बाळा) नर यांची निवड करण्यात आली. नर यांची महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येण्याची दुसरी वेळ आहे. पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७७ मधून ते १२ हजार ८५४ मतांनी निवडून आले आहेत. नर यापूर्वी स्थापत्य (उपनगर) अध्यक्षपद सांभाळले आहे. ते स्थायी समितीचेही सदस्यही होते. (प्रतिनिधी)