Join us

अनिल कपूरच्या ‘त्या’ स्टंटबाबतची कारवाई गुलदस्त्यातच

By admin | Updated: October 30, 2016 01:08 IST

अभिनेता अनिल कपूरने एका टि.व्ही. शोच्या प्रमोशनसाठी लोकलच्या दरवाज्यात (फुटबोर्ड) उभे राहून केलेल्या प्रवासाबाबत रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई

मुंबई : अभिनेता अनिल कपूरने एका टि.व्ही. शोच्या प्रमोशनसाठी लोकलच्या दरवाज्यात (फुटबोर्ड) उभे राहून केलेल्या प्रवासाबाबत रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्या ‘स्टंट’बाबत आयोजकांकडून खुलासा मागण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. एका स्वयंसेवी संस्थेने त्याबाबत केलेल्या तक्रारीवर रेल्वे सुरक्षा दलाला(आरपीएफ) अहवाल पाठविण्या व्यतिरिक्त कसलीही दखल घेण्यात आलेली नाही. अनिल कपूर यांनी प्रमोशनच्या निमित्याने १४ जुलै रोजी दुपारी चर्चगेट येथून मुंबई सेट्रल स्थानकापर्यत फुटबोर्डवर उभे रहात प्रवास केला होता. या ‘स्टंट’बाबत साहस फाऊंडेशनचे अध्यक्ष सय्यद फुरकान अहमद यांनी १६ जुलैला वांद्रे रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली होती. तपासामध्ये रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १५६ अन्वये भंग केल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबत रेल्वेच्या विशेष शाखेकडून ९ सप्टेंबरला ‘आरपीएफ’ला पत्र लिहून हा विषय त्यांच्या अखत्यारित असल्याने योग्य ती कारवाई करावी, असे कळविले. त्या घटनेला दोन महिन्याचा अवधी होत आलातरी अद्याप आरपीएफ व रेल्वे प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नसल्याचे समजते. (प्रतिनिधी)