Join us

अनिल देशमुख विरुद्ध परमबीर सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:05 IST

न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे- परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे नागरिकांचा राज्य पोलिसांवरचा विश्वास धोक्यात आला ...

न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे

- परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे नागरिकांचा राज्य पोलिसांवरचा विश्वास धोक्यात आला आहे.

- सेवेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने गृहमंत्र्यांवर केलेल्या या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सकृतदर्शनी गुन्हा दाखल करून घेण्यासारखे प्रकरण असेल तर त्याचा तपास करावा लागेल, असे उच्च न्यायालयाने ५२ पानी निकालात नमूद केले.

- लोकांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी या प्रकरणाचा स्वतंत्र यंत्रणेने तपास करणे आवश्यक आहे.

- अशा स्वरूपाचे आरोप आणि त्यानंतर केलेली कार्यवाही अभूतपूर्व आहे. या याचिकांवर सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांनी तरी असे कधीच पाहिले नाही.

- वेळ कोणीही पाहिला नाही, पण बहुतांशीवेळा आपण न पाहिलेल्या गोष्टी वेळ आपल्याला पाहायला लावते, हे खरे आहे, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

- राज्यघटना कायद्याच्या राज्याचे समर्थन करते, राजकीय पाठबळ असलेल्या गुंडांच्या शासनाचे नाही.

- ज्येष्ठ पोलीस अधिकारी मंत्र्यावर इतक्या खुलेपणाने भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, अशी घटना कधीही ऐकिवात नव्हती. अशास्थितीत न्यायालय केवळ बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. या प्रकरणाचा योग्य, निःपक्षपातीपणे तपास करावा, अशी नागरिकांची इच्छा असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे स्वतंत्र तपास यंत्रणेकडून तपास करण्याची गरज आहे.

.........................