Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:20 IST

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची येथील लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी सर्जरी पार पडली. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात ...

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची येथील लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी सर्जरी पार पडली. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. मात्र आता त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांनी परत अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार राऊत बुधवारी रुग्णालयात दाखल झाले होते. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मॅथ्यू आणि डॉ. अजित मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली अँजिओप्लास्टी करण्यात आली.