Join us  

डॉ दीपक सावंत यांच्यावर  लिलावतीत अँजिओप्लास्टी

By मनोहर कुंभेजकर | Published: February 16, 2023 3:08 PM

डॉ. दीपक सावंत हे  शुक्रवारी दि,२० जानेवारी रोजी रोजी सकाळी पालघरला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी जात असताना महामार्गावर काशिमीरा येथे त्यांच्या कारला डंपरने मागून जोरदार धडक दिली. त्यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली होती.

मुंबई - डम्परच्या जोरदार धडकेत जखमी झालेले राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यावर आज लिलावती रुग्णालयात अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करण्यात आली. डॅा मॅथ्यूज यांनी सावंत यांची अँजिओप्लास्टी केली. काल त्यांना येथे दाखल करण्यात आले होते.

डॉ. दीपक सावंत हे  शुक्रवारी दि,२० जानेवारी रोजी रोजी सकाळी पालघरला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी जात असताना महामार्गावर काशिमीरा येथे त्यांच्या कारला डंपरने मागून जोरदार धडक दिली. त्यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली होती.

 आपण या अपघाताच्या गुंतागुंतीच्या आजारातून बाहेर पडून पुन्हा एकदा पालघर मेळघाट व इतरत्र असलेले कुपोषण बालमृत्यू  आश्रमशाळा यावर पुन्हा लवकरच काम सुरू करू. इतकेच नही, तर डम्पर तसेच हेवी व्हेहीकल व रॅश ड्रायव्हींगमुळे निष्पाप नागरिकांना कायमचे अंपगत्व येते, यासाठी सुद्धा आपण काम करणार असल्याचा विश्वासही त्यांनी लोकमतकडे प्रकट केला.

ॲम्ब्युलन्ससाठी डेडिकेटेड लेन व ग्रीन कॉरीडर असावा,डंपर व अवजड वाहनांना गव्हर्नर स्पीड लावाण्याची सक्ती करावी यासह अनेक सूचना डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत.

अवजड वाहने आणि डंपर हे ट्राफीकचे नियमच पाळत नाही, हायवेची परिस्थिती ट्राफीक मुळे इतकी वाईट आहे की, दहिसर चेकनाका व ते कासा येथून येणारे २-३ रूग्ण आठवड्यात  दगावतात ही वस्तुंस्थिती आहे. आपल्याला अपघात झाल्यावर वर्सोव्या वरून पोलीस ॲम्ब्युलन्स यायला वेळ लागला तर  सामान्याचे काय?असा सवाल त्यांनी केला.

मेट्रोच्या  कामामुळे जनता त्रस्त आहे रस्ते उखडले आहेत.तसेच मुंबईतील पश्चिम व पूर्व उपनगरातील  मधील बेफाम कन्स्ट्रक्शन रोखा, मुंबईतील डंपर  पहाटे २.३० पासून बेफाम रस्ता कापतात,  सर्व सामान्याचा जीव  पार्किंगच्या गाडया तुडवतात याकडे जातीने लक्ष देण्याच्या संबंधितांना आदेश द्यावेत, तसेच रस्ते अपघाताची  माहिती घ्यावी अश्या सूचना त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

टॅग्स :दीपक सावंतअपघात