Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंदमानात ‘तो’ शिलालेख पुन्हा बसविणार

By admin | Updated: June 2, 2015 22:53 IST

अंदमानातील पोर्टब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्ये स्वा. सावरकरांच्या ‘की घेतले न हे व्रत आम्ही अंधतेने’... या काव्याचा शिलालेख ११ वर्षांपूर्वी तत्कालीन पेट्रोलियममंत्री

डोंबिवली : अंदमानातील पोर्टब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्ये स्वा. सावरकरांच्या ‘की घेतले न हे व्रत आम्ही अंधतेने’... या काव्याचा शिलालेख ११ वर्षांपूर्वी तत्कालीन पेट्रोलियममंत्री मणिशंकर अय्यर यांनी काढला होता. गतवर्षी मेमध्ये भाजपाचे सरकार येताच सावरकर जयंतीच्या निमित्ताने डोंबिवलीतील भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी पंतप्रधान कार्यालयाला या पंक्तीचा शिलालेख तिथे पुन्हा लावावा, असे पत्र धाडले होते. त्याची दखल घेत केंद्रीय गृह आणि पेट्रोलियम मंत्रालयाने त्यास सोमवारी हिरवा कंदील दिला आहे. केंद्राच्या निर्णयामुळे देशभरातील सावरकरप्रेमींना प्रचंड दिलासा मिळाला.