Join us  

...आणि राजधानी एक्स्प्रेस मध्य रेल्वेवरून दिल्लीकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 5:05 AM

मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शनिवारी तब्बल २६ वर्षांनंतर पहिली राजधानी एक्स्प्रेस दिल्लीकडे रवाना झाली.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शनिवारी तब्बल २६ वर्षांनंतर पहिली राजधानी एक्स्प्रेस दिल्लीकडे रवाना झाली. फुले, हार, फुगे यांनी सजलेल्या या एक्स्प्रेसला रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखविताच, एक्स्प्रेस दिल्लीकडे रवाना झाली.हजरत निजामुद्दीन (दिल्ली) येथे राजधानी एक्स्प्रेस रविवारी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. या एक्स्प्रेसचा फायदा देशाच्या अनेक भागांना होणार असून, या ट्रेनचा सध्याचा १८ तासांचा वेळ कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.राजधानी एक्सप्रेसचे लोको पायलट लाल कुमार, आर.एस. डेकाटे, गार्ड एस.एस. जाधव आणि ट्रेन कॅप्टन पी. वी. राव हे आहेत. ्नराजधानी एक्स्प्रेस सीएसएमटी टर्मिनस फलाट क्रमांक १८ वरून दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी सुटली. एक्स्प्रेसचे प्रत्येक थांब्यांवर जंगी स्वागत करण्यात आले.राजधानी एक्स्प्रेसला निजामुद्दीन (दिल्ली) येथे पोहोचण्यास १८ तासांचा कालावधी नियोजित करण्यात आला आहे. मात्र, तेथे एक्स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा लवकर पोहोचण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.>राजधानी एक्स्प्रेसचे पाच तासांत बुकिंग फुल्लमध्य रेल्वे प्रशासनाने मोठ्या दिमाखात राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्याची योजना आखली होती. ही योजना आज पूर्णत्वास येणार आहे. हे. सीएसएमटी (मुंबई) - हजरत निजामुद्दीन (दिल्ली) राजधानी एक्स्प्रेसचे बुकिंग अवघ्या पाच तासांत फुल्ल झाले. यासाठी मध्य रेल्वे मार्गावरील सर्व प्रवाशांनी एक्स्प्रेसचे स्वागत करून, सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राजधानी एक्स्प्रेसमध्ये एकूण ७५६ आसन क्षमता आहे. २२२२१ क्रमांकाची सीएसएमटी ते हजरत निजामुद्दीन जाणारी राजधानी एक्स्प्रेसमधील १ ए च्या २४ सीट, २ ए च्या १५६ सीट, ३ ए च्या ५७६ सीट अशा ७५६ सीटचे बुकिंग झाले आहे. ५ तासांच्या आत एक्स्प्रेसचे बुकिंग झाले आहे, हा एक विक्रम असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले.>प्रवासात मिळणार मिसळपावराजधानी एक्स्प्रेसच्या प्रवासादरम्यान मिसळ पावचा आस्वाद घेता येणार आहे. मिसळपाव रेल्वे प्रवासात मिळावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती. या मागणीला २८ वर्षांनंतर मान्यता मिळाली असून, मिसळपाव रेल्वे मेनू कार्डमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्व एक्स्प्रेसमध्ये मिसळपाव मिळणार आहे.>१ हजार ५४३ किमीचा प्रवासपश्चिम रेल्वेवरून मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस सुरू होती. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल किंवा वांद्रे टर्मिनस गाठावे लागत होते. मात्र, आता मध्य रेल्वेवर राजधानी एक्स्प्रेस सुरू झाल्याने, मुंबईकरांना दिल्ली गाठणे सोपे झाले आहे. पश्चिम रेल्वेवरून मुंबई-दिल्ली प्रवास १ हजार ३४५ किमीचा आहे, तर मध्य रेल्वेवरून १ हजार ५४३ किमीचा आहे. मुंबई, कल्याण, नाशिक, जळगाव येथील आणि यांच्या ठिकाणाच्या जवळील प्रवाशांना प्रवास करणे सोईस्कर होईल.>आठ लांब पल्ल्यांच्या मेल, एक्स्प्रेसच्या वेळेत बदलमुंबई-पुणे मार्गावर धावणाºया सिंहगड, सह्याद्री, सेवाग्राम, गोदावरी, पुणे-भुसावळ या एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.प्रीमियम दर्जाची सिकंदराबाद-हजरत निजामुद्दीन राजधानी, मद्रास-निजामुद्दीन गरीबरथ, सीएसएमटी जनसाधारण, एलटीटी-लखनऊ एसी सुपरफास्ट या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.>राजधानी एक्स्प्रेसचे तिकीट दरएक्स्प्रेस स्थानक प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी तृतीय श्रेणीमुंबई सेंट्रल टर्मिनस "4,730 "2,830 "2,040वांद्रे टर्मिनस "5,445 "3,230 "2,300सीएसएमटी "5,025 "2,990 "2,160