पनवेल : पनवेल-सायन महामार्गावर खारघर येथे उभारलेला टोलनाका रद्द करा किंवा स्थानिक वाहनांना सवलत द्या. याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर आमदार प्रशांत ठाकूर आगामी विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचा इशारा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी जाहीर कार्यक्रमात दिला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समक्ष ठाकूर यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे शासन याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर पनवेल-सायन महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. झालेला खर्च खारघर येथे टोलनाका उभारून वसूल करण्याचे धोरण सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतले आहे. मात्र वाशी टोलनाका काही कि.मी. अंतरावर असताना खारघर येथे टोलनाका उभारला कसा, हा सवाल आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर हे काम मुंबई आणि पुणो हे अंतर कमी करण्यासाठी करण्यात आले आहे. त्यामुळे वाशी येथील टोलनाक्यावर टोल आकारण्यात यावा. याचा भरुदड स्थानिकांना नको, अशी भूमिका त्यांनी मांडली. याचे कारण म्हणजे पनवेलकरांना दररोज कामासाठी कोकण भवनाकडे जावे लागते. त्याचबरोबर खारघरवासीयांना पनवेलला शासकीय कार्यालय, बाजारपेठेत जा-ये करावी लागते त्यांच्यावर पथकराचा भार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. ‘नो मोअर टोल’ असे म्हणत काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठे जनआंदोलन उभारण्यात आले. जुलै महिन्यात रास्ता रोको करण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांनी याबाबत त्वरित मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या संदर्भातील अहवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर करण्यात आला आहे. यामध्ये झालेला खर्च देऊन खारघर टोलनाका टोल फ्री करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्या बदल्यात संबंधित ठेकेदाराला एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आहे, मात्र याबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. निवडणुकांची तारीख कधीही जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. असे असतानाही टोलबाबत धोरण जाहीर करण्यास विलंब लावला जात असल्यामुळे स्थानिक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकत्र्याकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी आज काँग्रेस पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात हा इशारा दिला. (वार्ताहर)
किमान एमएच 46, क्6ला टोलमाफी मिळावी
4आमदार प्रशांत ठाकूर यांनी हा प्रश्न अतिशय प्रतिष्ठेचा केला आहे. याकरिता मध्यंतरी त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. टोलनाका सुरू करा अगर करू नका पण याचा भार पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघरवाशींवर लादू नका, अशी आग्रही मागणी आजही माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केली.
4या पथकरातून एमएच-46 आणि क्6 या पनवेल आणि पेण आरटीओ पासिंगच्या वाहनांना सूट देण्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. स्थानिकांना सूट दिली तरी प्रशांत ठाकूर विधानसभा निवडणूक लढवतील, असेही रामशेठ ठाकूर यांनी स्पष्ट केले. आमदार ठाकूर यांनीही हात वर करून या भूमिकेला सहमती दर्शवली. ‘प्रशांत ठाकूर आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देऊन उपस्थितांनी या निर्णयाला पाठिंबा दिला.