Join us  

... आणि बचावासाठी पुढे केलेला हातच गमावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 4:52 AM

दुचाकीच्या धडकेत स्कूटी घसरल्याने डॉ. प्रकाश वझे मागच्या ट्रकखाली आले, तर त्यांचे कम्पाउंडर हनुमंत नागप्पा हेगडे थोडे पुढे जाऊन पडले. दरम्यान, ट्रक आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याला थांबण्यासाठी हात पुढे केला. मात्र...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दुचाकीच्या धडकेत स्कूटी घसरल्याने डॉ. प्रकाश वझे मागच्या ट्रकखाली आले, तर त्यांचे कम्पाउंडर हनुमंत नागप्पा हेगडे थोडे पुढे जाऊन पडले. दरम्यान, ट्रक आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याला थांबण्यासाठी हात पुढे केला. मात्र, भरधाव ट्रक त्यांच्या हातावरून गेला आणि पुढे केलेला हात गमवावा लागल्याचे दु:ख हेगडेंनी व्यक्त केले.मुलुंड पूर्वेकडील हनुमान चौकातच हनुमंत हेगडे सहकुटुंंब राहातात. याच परिसरात डॉ. वझे यांचा दवाखाना आहे. हेगडे यांचे कुटुंबीय गेल्या १५ वर्षांपासून डॉ. वझे यांच्या दवाखान्यात काम करतात. हनुमंत यांची बहीण पार्वती ही वझे यांच्याकडे नोकरीला होती. तिच्या लग्नानंतर आई नरसम्मा आणि हनुमंत यांची पत्नी हेरंभा यांनी दवाखान्यात काम केले. त्यानंतर, गेल्या तीन वर्षांपासून हनुमंत तेथे मदतनीस म्हणून काम करतात.शुक्रवारी दुपारी बुद्धिबळ स्पर्धेचे बॅनर घेऊन ते वझे यांच्या स्कूटीवरून मुलुंडला निघाले. त्याच दरम्यान हा अपघात घडला. डॉ. वझे मागच्या ट्रकखाली आले, तर हेगडे पुढे जाऊन पडले. ट्रक भरधाव वेगाने येत असल्याचे लक्षात येताच हेगडे यांनी त्याला ‘प्लीज थांबा’ म्हणत हात पुढे केला. मात्र, तोपर्यंत ट्रक त्यांच्या दोन्ही हातावरून गेला. शनिवारी त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाली. त्यांना या अपघातात एक हात गमवावा लागला आहे. मित्र परिवाराने पैसे जमवून त्यांच्या उपचाराचा खर्च भागवत असल्याचे त्यांचे भाऊ दुर्गप्पा हेगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

टॅग्स :अपघात