Join us  

...अन् संशयास्पद मृत्यूचा ४८ तासांत उलगडा! नागपाडा पोलिसांची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 3:34 AM

मध्यरात्री फोन खणाणला... एका हॉटेलमधील कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती नागपाडा पोलिसांना मिळाली. घटनास्थळी धाव घेत तापासाला सुरुवात केली. पोटमाळ्यावरून पडून मृत्यू होणे शक्य नाही, मालकानेच त्याची हत्या केल्याचा आरोप कामगाराच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला.

- मनीषा म्हात्रेमुंबई : मध्यरात्री फोन खणाणला... एका हॉटेलमधील कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती नागपाडा पोलिसांना मिळाली. घटनास्थळी धाव घेत तापासाला सुरुवात केली. पोटमाळ्यावरून पडून मृत्यू होणे शक्य नाही, मालकानेच त्याची हत्या केल्याचा आरोप कामगाराच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला. प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यामुळे पोलिसांवर दबाव वाढला. लवकरात लवकर छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले.शवविच्छेदनाच्या अहवालातून डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. कुटुंबीयांकडून पोलिसांच्या तपासावर संशय घेत मालकाला अटक करण्याची मागणी जोर धरू लागली. पोलिसांनी वरिष्ठांची परवानगी घेत मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन केले. डोक्याला जबर मार बसल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले. मुळात घटनेच्या दिवशी लोखंडी जिन्यालगतच्या पोटमाळ्यावर कामगार झोपला होता. झोपेतच तो खाली पडला. त्याच दरम्यान लोखंडी जिन्यावर डोके आदळल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे तपासात उघड झाले; आणि या न घडलेल्या हत्येचा अवघ्या ४८ तासांत उलगडा करण्यास पोलिसांना यश आले.अशा प्रकारे अनेक गुन्ह्यांची उकल नागपाडा पोलिसांनी केली आहे. भायखळा कारागृहातील वार्डन मंजुळा शेट्येच्या हत्येच्या निषेधार्थ कारागृहात पेटलेले आंदोलनही नागपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बसवत आणि त्यांच्या पथकाने शिताफीने हाताळले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुमारे पावणे पाच लाख लोकसंख्या असलेल्या नागपाड्याची जबाबदारी केवळ १९६ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. मुस्लीमबहुल लोकवस्ती असलेल्या या परिसरात कायदा व सुव्यस्था राखण्याची टांगती तलवारही पोलिसांवर असते. तसेच फसवणूक, हुंडाबळी, मारामारी आणि सायबर गुन्ह्यांचे प्रमाण या ठिकाणी जास्त आहे. बॉम्बे सेंट्रल, राज्य दहशतवादविरोधी पथकाचे मुख्यालय, एसटी आणि बेस्ट बस डेपो, पोस्ट आॅफिससारखी प्रमुख ठिकाणे याच पोलीस ठाण्याअंतर्गत येतात. त्यामुळे विविध आंदोलनांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारीही असते.कर्मचाºयांसाठीही पुढाकारकर्मचाºयांसाठी आरोग्य शिबिर, विविध खेळांच्या स्पर्धात्मक उपक्रमांतून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. तसेच महिला पोलिसांसाठी हळदी-कुंकूचाही कार्यक्रम घेण्यात येतो. शिवाय शिपायापासून ते अधिकाºयांपर्यंत सर्वांच्याच समस्या जवळून जाणून घेण्यासाठी बसवत यांचा प्रयत्न असतो.बंदोबस्ताची प्रमुख जबाबदारीया परिसरात २७ माशिदी आहेत. त्यामुळे शुक्रवारच्या नमाजासह ईद, मोहरमदरम्यान बंदोबस्ताची प्रमुख जबाबदारी पोलिसांवर असते. शिवाय लालबागच्या राजाची मिरवणूक याच हद्दीतून जात असल्याने कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांना नेहमी सतर्क राहावे लागते.चौकाचौकांत जनजागृती सभाहातात माइक घेऊन अधिकारी, कर्मचारी नागरिकांमध्ये विविध गुन्ह्यांबाबत जनजागृती करताना दिसतात. प्रत्येक चौकात त्यांच्याकडून सभा घेण्यात येतात. यादरम्यान नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर तोडगा काढण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू असतो. ‘पोलीस दीदी’ उपक्रमाअंतर्गत शाळकरी मुलींना लैंगिक शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.दलालांचा सुळसुळाटबॉम्बे सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या गर्दीत मोबाइल चोरी, मोर्लंड रोड झोपडपट्टीसारख्या परिसरात मारामारीसारख्या आणि कामाठीपुरा परिसरात दलालांचा सुळसुळाट रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.येथे करा संपर्कपरिमंडळ ३पोलीस उपायुक्त - वीरेंद्र मिश्रसाहाय्यक पोलीस आयुक्त - नागेश जाधववरिष्ठ पोलीस निरीक्षक - संजय बसवत- ९८७०१६७७४८, पोलीस ठाणे २३०७८१०९सहकार्य कायम ठेवानागरिकांकडून नेहमीच चांगले सहकार्य मिळते. असेच सहकार्य कायम ठेवा. नेहमीच सतर्क राहा. अफवांवर विश्वास ठेवू नका. आपली गोपनीय माहिती कुणालाही शेअर करू नका.- संजय बसवत,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नागपाडा

टॅग्स :पोलिस