Join us
Daily Top 2Weekly Top 5

...आणि हिरमोड झाला

By admin | Updated: March 26, 2015 23:54 IST

गुरुवार... वर्ल्डकप स्पर्धेतील भारत विरुध्द आॅस्टे्रलिया उपांत्य फेरीचा सामना... त्यामुळे सकाळी ९ वाजल्यापासूनच सर्व क्रिकेटप्रेमी टीव्हीसमोर ठाण मांडून बसले होते.

मुंबई : गुरुवार... वर्ल्डकप स्पर्धेतील भारत विरुध्द आॅस्टे्रलिया उपांत्य फेरीचा सामना... त्यामुळे सकाळी ९ वाजल्यापासूनच सर्व क्रिकेटप्रेमी टीव्हीसमोर ठाण मांडून बसले होते. कोणी कॉलेज - आॅफीसला दांडी मारली होती, तर कोणी विविध कारणे देऊन थेट सुट्टीच घेतली होती. मात्र एकूणच सामन्यात झालेला टीम इंडियाचा दारुण पाहता सर्वांचाच हिरमोड झाला आणि त्याचा सर्व राग उमटला तो सोशल कट्ट्यावर.ज्या आॅस्टे्रलिया विरुध्द सतत पराभवाचे तोंड पाहावे लागत होते त्याचा वचपा काढण्याचा ‘मौका’ मिळालेला असल्याने तमाम क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सकाळपासूनच मुंबईत घराघरामध्ये भारत-आॅस्टे्रलिया सामना पाहण्यात येत होता. यामध्ये क्रिकेट न कळणाऱ्या व्यक्तींचा देखील समावेश असल्याने संपुर्ण माहोल क्रिकेटमय झालेले. कामानिमित्त घराबाहेर पडलेले विविध अ‍ॅप, एफएम किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्कोअर्स अपडेट घेत होते. टीव्हीच्या दुकानासमोर मोठा प्रेक्षक पाहावयास मिळत होता. रस्त्याच्या कडेला कोणीही कानामध्ये हेडफोन्स घातलेला दिसला की, हमखासत्याला ‘स्कोअर कितना हुआ?’ असा प्रश्न विचारला जायचा आणि ‘फुल्ल डिटेल’मध्ये अपडेट देखील मिळत होते.सामन्याच्या पहिल्या सत्रातील भारताची कामगिरी पाहता मुंबईकरांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शेवटच्या ४-५ षटकांतील धुलाई सुरु झाल्यानंतर मात्र मुंबईकरांचा पारा चांगलाच चढला. जडेजा आऊट आॅफ फॉर्मआॅस्ट्रेलियासमोर भारतीयांचा लाजिरवाणा पराभव झाला. रविंद्र जडेजा पूर्ण सिरीजमध्ये खेळाला नाही. पण सेमी फायनलमध्ये खेळेल असे वाटले होते, पण पदरात निराशाच पडली. - प्रजेश वाघधरे (एम.डी कॉलेज) विराटचे लक्ष खेळात नव्हतचे मला अपेक्षा होती की विराट शतक ठोकेल पण त्याच्याकडून साधे दहा रन सुद्धा झाले नाही. मला असे वाटे की त्याचे खेळत लक्ष नव्हते. सुरुवातीपासून योग्य आखणी असली असती तर कदाचित आज आपण कांगारुचा पराभव के ला असता. सामना जिंकणे हातात होते पण तितक्या जिद्दीने प्रयत्न के ले नाही.- प्राची वेदांते (बुरहानी कॉलेज)ओव्हरकॉन्फीडन्स...! : सतत ७ मॅच जिंकल्यानंतर भारत सेमी फायनल जिंकेल अशी अपेक्षा होती. जिंकण्यासाठी सगळयांनीच प्रयत्न केले. पण शेवटी हा खेळ आहे, त्यात हार जीत ही असतेच तर कधी - कधी हरण्याची मजा देखील घ्यावी.- शशिकांत गोसावी (साठये महाविद्यालय)अति घाई संकटात नेई...: फलंदाजांची पार्टनरशीप बरोबर नव्हती. धोनीनेच चांगली कामगीरी बजावली पण त्याला पुरेसा पाठींबा मिळाला नाही. रैना आणि विराट दबावाखाली येऊन शॉट मारण्याच्या नादात विकेट गमावून बसले आणि पराभवाचे संकट ओढावून घेतले. - सनील कुवळेकर (विद्यार्थी)युवराज कम बॅक : गतस्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत युवराज सिंगने आॅस्ट्रेलियाविरोधात दमदार कामगिरी केली होती. युवराजची कमतरता भासली. जर तो असता तर भारत फायनलमध्ये नक्की पोहोचला असता. ‘युवी’ने कांगारुंना लोळावले असते हे नक्की. - अक्षय नर (भवन्स महाविद्यालय)