Join us

ट्रम्प यांच्या विजयामुळे मुंबईमध्ये आनंद

By admin | Updated: November 11, 2016 03:52 IST

अमेरिकेतील राष्ट्रपती पदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे मुंबईतील ट्रम्पच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मुंबई : अमेरिकेतील राष्ट्रपती पदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे मुंबईतील ट्रम्पच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राष्ट्रपती पदासाठी जेव्हा ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये प्रचार अभियानाला सुरुवात केली होती, तेव्हा अभिषेक लोढा यांनी त्यांना पत्र लिहिले होते. त्याला प्रतिसाद देत ट्रम्प यांनी लोढा ग्रूपचे कौतुक केले होते. मुंबईमध्ये ट्रम्प यांच्या नावावर उभ्या राहत असलेल्या ट्रम्प टॉवरमध्ये डोनाल्ड ट्रंप यांची कंपनी ट्रम्प आॅर्गनायझेशन ही लोढा ग्रूपची भागीदार आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या अमेरिकेतील राष्ट्रपती पदाच्या ऐतिहासिक विजयावर लोढा ग्रूपकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात आल्या. ट्रम्प आॅर्गनायझेशन हा लोढा ग्रूपचा एक विश्वासू आणि महत्त्वाचा भागीदार असून मुंबईतील ट्रम्प टॉवरला सर्वोत्तम पद्धतीने विकसित करण्यासाठी एकत्र काम करण्याविषयी कटिबद्ध असल्याचे लोढा यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)