Join us  

अनधिकृत पार्किंगच्या दंडाची रक्कम होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 5:47 AM

पालिकेकडून विविध पर्यायांवर चर्चा सुरू; नवे परिपत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता

मुंबई : मुंबई महापालिकेकडून अनधिकृत पार्किंगबाबत आकारल्या जाणाऱ्या दंडाची रक्कम कमी होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या विश्वसनीय सूत्रांनी या वृत्तास दुजोरा दिला असून, या संदर्भातील कार्यवाही मात्र केव्हा सुरू होईल? याबाबत अद्यापही सुस्पष्टता नसल्याचे चित्र आहे. अनधिकृत पार्किंगबाबत मुंबई महापालिकेडून दहा हजार रुपयांचा दंड ठोठविला जात आहे.

महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर व रस्त्यांलगत अनधिकृत पार्किंगला प्रतिबंध होऊन रस्ते मोकळे व्हावे व वाहतूक सुरळीत व्हावी, याबरोबरच केवळ वाहनधारकांनाच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांनाही सार्वजनिक सुविधांचा लाभ अधिक चांगल्याप्रकारे घेता यावा, हा या कारवाईमागील हेतू आहे. या कारवाईतून प्राप्त होणारी रक्कम ही संबंधित विभागातील विकास कामांसाठीच वापरण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. रस्त्यांवर अवैध पार्किंग केल्यास चारचाकी वाहनांना दहा हजार रुपयांचा दंड मुंबई महापालिकेकडून ठोठाविला जात आहे. मात्र, आता या दंडाची रक्कम कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या संदर्भातील घोषणा लवकरच केली जाईल. मुंबई महापालिकेचे अधिकारी याबाबत चर्चाविनिमय करत असून, वेगवेगळ्या पर्यायांवर चर्चा सुरू आहे. यातून मार्ग काढण्यात आल्यानंतर दंडाची रक्कम करण्यात येणार आहे.

महापालिका याबाबत काम करत आहे. लवकरच दंडाच्या नव्या रकमेबाबत माहिती देणारे नवे परिपत्रक काढले जाईल. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या पार्किंग स्थळापासून एक किमीच्या अंतरातील ‘नो पार्किंग झोन’मध्ये वाहनांचे अवैध पार्किंग केल्याचे आढळल्यास दहा हजार रुपये दंड ठोठावला जातो. दंड न भरल्यास ते वाहन टोइंग मशीनद्वारे उचलून नेले जाते. मुंबई महापालिकेने ७ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावजणी सुरू केली आहे.

पहिल्याच दिवशी १ लाख ८० हजारांची दंडवसुलीच्७ जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या कारवाईच्या पहिल्याच दिवशी ५६ वाहनांवर कारवाई करण्यात येऊन १ लाख ८० हजार रुपये एवढी दंडवसुली करण्यात आली.च्८ जुलै रोजी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान ३५ चार चाकी, ३ तीन चाकी व ४२ दुचाकी; यानुसार एकूण ८० वाहनांवर कारवाई करण्यातआली. या कारवाईपोटी १ लाख ७० हजार ३४० रुपये दंड स्वरूपात रक्कम जमा झाली.च्कारवाई सुरू केल्यापासून पहिल्या दोन दिवसांत १३६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ८० चार चाकी, ६ तीन चाकी व ५० दोन चाकी वाहनांचा समावेश आहे. या कारवाईपोटी दोन दिवसांत ३ लाख ५० हजार ३४० रुपये एवढी रक्कम दंड वसुलीतून जमा झाली.च्९ जुलै रोजी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान ५३ चार चाकी, ३ तीन चाकी व ५१ दुचाकी; यानुसार एकूण १०७ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईपोटी ५ लाख १९ हजार ४६० रुपये एवढी रक्कम दंड स्वरूपात जमा झाली.असा आकारण्यात येतो दंडच्सार्वजनिक वाहनतळालगतच्या ५०० मीटरच्या परिसरात एखादे अवजड वाहन अनधिकृतपणे उभे असल्याचे आढळून आल्यास, त्यावर किमान १५ हजार रुपये दंड आकारणी करण्यात येत आहे.च्मध्यम आकाराच्या वाहनांवर रुपये ११ हजार, तर कार-जीप यांसारखी वाहने अनधिकृतपणे पार्किंग केले असल्याचे आढळून आल्यास, त्यावर "१० हजार एवढा दंड आहे.च्रिक्षा, साइडकार असलेले दुचाकी वाहन इत्यादी तीन चाकींवर रुपये ८ हजार, तर अनधिकृतपणे पार्क केलेल्या दुचाकी वाहनांवर किमान रुपये ५ हजार एवढी दंडाची रक्कम आकारण्यात येत आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकापार्किंग