मुंबई : सायन-पनवेल मार्गावरील खारघर नाक्यावर पनवेल तालुक्यातील सर्व वाहनधारकांना टोलमधून सूट देण्याच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या (विशेष प्रकल्प) अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. पनवेल तालुक्यातील सर्व गावे व शहर वसाहतीतील वाहनधारकांच्या अडचणींचा अभ्यास करून समिती उपाययोजना सुचवेल. राज्यातील इतर टोलनाक्यांबाबत काय परिणाम होतील याचा अभ्यास करून समिती सरकारला उपाययोजना सुचविणार आहे. मुंबई बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता, पीपीपी तज्ज्ञ अजय सक्सेना, सायन पनवेल टोलवेज प्रा.लि.पुणेचे प्रतिनिधी हे या समितीचे सदस्य आहेत. बहुमजली इमारती व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे सदस्य सचिव असतील. आ. प्रशांत ठाकूर यांचा मात्र समितीत समावेश नाही. आ. ठाकूर यांनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. या समितीच्या शिफारशीनुसार ५ जानेवारी रोजी टोलनाका सुरू करण्याबाबतची अधिसूचना काढली होती. कळंबोली, पनवेल,कामोठे, कोपरा व खारघर या पाच गावांतील रहिवाशांच्या कार तसेच एसटी महामंडळाच्या सर्व बसेसना टोलमधून सूट दिली आहे. (विशेष प्रतिनिधी)
खारघर टोलनाक्यावर समितीची मात्रा
By admin | Updated: January 18, 2015 01:46 IST