Join us

अमोल कीर्तिकर यांनी घेतले श्री श्री रविशंकर यांचे आशिर्वाद

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 11, 2024 18:38 IST

आपल्या समोर कोण उमेदवार आहे याची विचारणा त्यांनी केली. अजून आपल्या समोर उमेदवार नसल्याने आपला विजय बिनविरोध आहे असे त्यांनी सांगितले.

मुंबई - उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आध्यात्मिक गुरु, परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे आज वरळीत दर्शन घेतले. त्यांचे आशिर्वाद व मार्गदर्शन घेवून त्यांच्याशी सुमारे 20 मिनीटे चर्चा केली.

आपल्या समोर कोण उमेदवार आहे याची विचारणा त्यांनी केली. अजून आपल्या समोर उमेदवार नसल्याने आपला विजय बिनविरोध आहे असे त्यांनी सांगितले.

गुरुजींचा अशिर्वाद मिळाल्याचा आनंद ऊर्जादायी आहे व  त्यांच्या सभोवतालची ऊर्जा, सकारात्मकता व मनशांतीचा अनुभव अद्भुत आहे.परमपूज्य श्री श्री रविशंकर गुरुजींनी दिलेल्या मार्गदर्शन व आशीर्वादांसाठी मी कृतज्ञ आहे असे प्रतिपादन अमोल कीर्तीकर यांनी केले. 

टॅग्स :मुंबईशिवसेना