Join us

जुहू येथील ऋतुंबरा कॉलेजमधील कोविड केअर सेंटरसाठी अमिताभ बच्चन यांचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:05 IST

मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जुहू येथील ऋतुंबरा कॉलेजमध्ये सुविधायुक्त २५ ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात ...

मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जुहू येथील ऋतुंबरा कॉलेजमध्ये सुविधायुक्त २५ ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी या कोविड केअर सेंटरसाठी मदतीचा हात दिला. या सेंटरला लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च त्यांनी केला.

अंधेरी पश्चिमचे भाजप आमदार अमित साटम यांच्या प्रयत्नाने व मुंबई महापालिकेच्या सहकार्याने येथे सुसज्ज कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. येथील प्रसिद्ध डॉ. जयंत बर्वे यांच्याहस्ते या कोविड सेंटरचे लोकार्पण झाले. यावेळी के. पश्चिम वॉर्डचे सहायक आयुक्त विश्वास मोटे, अंधेरीतील पालिकेचे भाजप नगरसेवक, पालिकेचे अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या कोविड केअर सेंटरमध्ये मेडिटेशन सेंटर, सकस शाकाहारी जेवण, व्हीलचेअरची सुविधा, फिजिओथेरपी, मानसिक आराेग्यासाठी समुपदेशन, पॅथाॅलाॅजी लॅब, सीटी स्कॅन आदी सुविधा उभारण्यात आल्या आहेत, अशी माहिती आमदार साटम यांनी दिली.