Join us

अमित शहा यांना खटल्याला हजर न राहण्याची मुभा

By admin | Updated: November 11, 2014 01:56 IST

खटल्यासाठी व्यक्तिश: हजर न राहण्याची मुभा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना विशेष सीबीआय न्यायालयाने सोमवारी दिली.

सुरोबुद्दीन एन्काउंटर 
मुंबई :  गुजरात येथील बहुचर्चित सुरोबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी मुंबईत सुरू असलेल्या खटल्यासाठी व्यक्तिश: हजर न राहण्याची मुभा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना विशेष सीबीआय न्यायालयाने सोमवारी दिली.
ही मुभा खटला संपेर्पयत द्यावी, अशी विनंती शहा यांनी केली होती. मात्र आरोपनिश्चिती हाईर्पयत ही मुभा देण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. सुरोबुद्दीन व त्याची पत्नी कस्तुरी बी यांचा 2क्क्5 मध्ये एन्काउंटर झाला. यातील मुख्य साक्षीदार तुलसीदास प्रजापती याचाही नंतर एन्काउंटर झाला. याप्रकरणी 37 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात शहा यांचेही नाव आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 
याचा खटला मुंबईत वर्ग करण्यात आला.  (प्रतिनिधी)