Join us

सोहराबुद्दीन प्रकरणातून दोषमुक्त करा -अमित शाह

By admin | Updated: December 9, 2014 02:54 IST

गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख व त्याची पत्नी कस्तुरी बी यांच्या एन्काउंटर प्रकरणातून दोषमुक्त करा, अशी मागणी करणारा अर्ज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विशेष न्यायालयात केला आह़े

मुंबई : गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख व त्याची पत्नी कस्तुरी बी यांच्या एन्काउंटर प्रकरणातून दोषमुक्त करा, अशी मागणी करणारा अर्ज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विशेष न्यायालयात केला आह़े या अर्जावर मंगळवारी पुन्हा युक्तिवाद होणार आह़े हा एन्काउंटर 2क्क्5मध्ये झाला़ यात शहा हेही आरोपी आहेत़ मात्र राजकीय वैमन्यस्यातून आपल्याला या गोवले गेले आह़े गृहमंत्री असताना पोलिसांच्या संपर्कात राहणो हे माङो काम होत़े त्यामुळे मला या एन्काउंटरशी थेट जोडणो गैर आह़े या प्रकरणाशी काहीही संबंध नसून यातून मला दोषमुक्त करावे, अशी मागणी शहा यांनी अर्जात केली़