मुंबई : ऑडिट ब्युरो ऑफ सक्यरुलेशनच्या (एबीसी) 2014 - 2015 या वर्षासाठी मल्याळम मनोरमाचे निवासी संपादक आणि संचालक अमित मॅथ्यू यांची अध्यक्षपदी तर आयपीजी मीडियाब्रॅन्डचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष शशिधर सिन्हा यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ब्युरोच्या व्यवस्थापन समितीवरील प्रकाशकांच्या प्रतिनिधींमध्ये लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांचा समावेश आहे.
एबीसीच्या समितीवरील प्रकाशकांचे प्रतिनिधी पुढीलप्रमाणो - अमीत मॅथ्यू (मल्याळम मनोरमा कं. लि.) - अध्यक्ष, शैलेश गुप्ता (जागरण प्रकाशन लि.), अरीत्र सरकार (एबीपी प्रायव्हेट लि.), आय. वेंकट (उषोदया एंटरप्रायङोस लि.), होरमुसजी कामा (दि बॉम्बे समाचार प्रायव्हेट लि.), देवेंद्र दर्डा (लोकमत मीडिया प्रायव्हेट लि.), संजीव व्होरा (बेनेट कोलमन अॅन्ड कं. लि.), बेनॉय रायचौधरी (एच.टी. मीडिया लि.)
जाहिरात एजन्सीचे प्रतिनिधी - शशिधर सिन्हा (मॅकॉन इरिक्सन (इंडिया) प्रायव्हेट लि.) - उपाध्यक्ष, मधुकर कामथ (मुद्रा कम्युनिकेशन प्रायव्हेट लि.) - मानद कोषाध्यक्ष, श्रीनिवास स्वामी (आरके स्वामी बीबीडीओ प्रायव्हेट लि.), सीव्हीएल श्रीनिवास (ग्रुप एम मीडिया इंडिया प्रायव्हेट लि.)
जाहिरातदारांचे प्रतिनिधी - रवींद्र पिशरोडी (टाटा मोटर्स लि.), देवाव्रत मुखर्जी (कोका कोला इंडिया प्रायव्हेट लि.), हेमंत मलिक (आयटीसी लिमिटेड) - मानद सचिव. होरमुद मसानी हे सरचिटणीस म्हणून काम पाहतील. (प्रतिनिधी)