Join us

अमेरिकन कंपनीला फसविणारा अटकेत

By admin | Updated: November 18, 2016 04:16 IST

एका अमेरिकन कंपनीला लाखोंचा गंडा घालण्याचा प्रकार अंबोली परिसरात घडला.

मुंबई : एका अमेरिकन कंपनीला लाखोंचा गंडा घालण्याचा प्रकार अंबोली परिसरात घडला. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी मोहम्मद युसूफ अन्सारीला बुधवारी अटक केली.अंधेरी येथील एक्सल रिअ‍ॅलिटी अँड इन्फ्रा लिमिटेड कंपनीत अन्सारी लॉस प्रिव्हेंटिव्ह अधिकारी म्हणून काम करत होता. ही कंपनी अमेरिकेतील गिफ्ट काडर््स स्प्रेड कंपनीच्या ग्राहकांचे शंकानिरसन करणे, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा बॅलन्स तपासण्याचे काम करते. ही जबाबदारी अन्सारीवर सोपविण्यात आली होती. अन्सारीने गिफ्ट कार्ड्स एक लाख अमेरिकन डॉलरला विकली. ही किंमत भारतीय चलनात सत्तर लाख रुपये आहे. त्यातील ४९ लाख रुपये स्वत:च्या बँक खात्यात जमा केले होते. (प्रतिनिधी)